पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी हा नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतो. पाकिस्तान क्रिकेटमध्ये सुरू असलेल्या गोंधळादरम्यान शाहिद आफ्रिदीला सिलेक्शन कमिटीचा अध्यक्ष बनवण्यात आलं आहे. अशात 'लाला'ची पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेटमध्ये घरवापसी झाली आहे.
शाहिद आफ्रिदी नेहमीच काहीना काही कारणांनी चर्चेत असतो. शाहिदने काही दिवसांआधीच त्याच्या घराचा एक व्हिडीओ यूट्यूबवर शेअर केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. कराचीमध्ये असलेल्या शाहिदच्या घरात काय काय आहे हे जाणून घेऊ...
शाहिद आफ्रिदीने कराचीमध्ये समुद्र किनारी एक मोठा बंगला बांधला आहे. जिथे तो नेहमीच त्याच्या मित्रांसोबत दिसतो. शाहिदने व्हिडीओत त्याचं पूर्ण घर दाखवलं. ज्यात बरंच इंटरेस्टींग कलेक्शनही आहे.
या व्हिडीओत शाहिदने त्याच्या यशाबाबत सांगितलं. अनेक अवार्ड्स आणि खास बॅटचं कलेक्शन दाखवलं. सोबतच बाहेरून येणाऱ्या मित्रांसाठी बसण्याची जागा आणि आपल्या घरातील गेमिंग एरियाही दाखवला.
खास बाब म्हणजे त्याच्या कलेक्शनमध्ये विराट कोहलीने साइन केलेली टी-शर्टही आहे. त्याशिवाय शाहिदकडे वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकरने साइन केलेल्या टी-शर्टही आहेत.
शाहिदने त्याच्या कलेक्शनमध्ये असलेली सोन्याची बंदुकही व्हिडीओत दाखवली. त्याला ही बंदुक गिफ्टमध्ये मिळाली होती. ज्यावर सोन्याचा मुलामा आहे. शाहिदचा हा व्हिडीओ यूट्यूबवर फार फेमस आहे.
दरम्यान, सध्या पाकिस्तानी क्रिकेट टीममध्ये सध्या गोंधळ सुरू आहे. शाहिदला सिलेक्शन कमेटीची जबाबदारी मिळाली आहे. याआधी पीसीबी चीफच्या पदावरून रमीज राजाची हकालपट्टी झाली होती. नजम सेठीला ती जबाबदारी देण्यात आली.