शाहिद आफ्रिदीनं २५ वर्ष जगाला फसवलं?; वन डेतील युवा शतकविराचा विक्रम त्याचा नाहीच, जाणून घ्या नेमकं काय घडलं

Shahid Afridi turn to be 44 years पाकिस्तानाचा माजी कर्णधार आणि मॅच विनर शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) याचं वय पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. १ मार्चला त्याचा वाढदिवस आणि त्यानिमित्तानं आफ्रिदीनं एक ट्विट केलं.

पाकिस्तानाचा माजी कर्णधार आणि मॅच विनर शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) याचं वय पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. १ मार्चला त्याचा वाढदिवस आणि त्यानिमित्तानं आफ्रिदीनं एक ट्विट केलं. त्याच्या या ट्विटनं पुन्हा एकदा गोंधळ उडवला आणि सोशल मीडियावर आफ्रिदीचं नेमकं वय किती?, अशी चर्चा सुरू झाली आहे.

शाहिद आफ्रिदीनं ट्विटमध्ये त्याचं वय ४४ असं लिहिलं. आफ्रिदीनं त्याच्या आत्मचरित्रात त्याचं वय ४६ वर्ष असल्याचे लिहिले आहे आणि काही वेबसाईटवर त्याचं वय ४०-४१ असं दाखवलं जात आहे. वेगवेगळ्या वयामुळे आफ्रिदीला आता ट्रोल केलं जात आहे.

शाहिद आफ्रिदीनं त्याच्या गेम चेंजर या आत्मचरित्रातही वयाबाबत खुलासा केला आहे. कागदपत्रात दाखवण्यात आलेल्या वयापेक्षा त्याचं खरं वय अधिक आहे, असे त्यानं म्हटलं आहे. या दोन्ही तारखांमध्ये पाच वर्षांचा फरक आहे. त्याच्या या खुलाशानंतर खूप वादही झाला.

आता आफ्रिदीच्या या ट्विटवनं पुन्हा चर्चेला विषय मिळाला आहे. त्यानं ट्विट केलं की,''मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. मी आज ४४ वर्ष पूर्ण केली. फॅन्स आणि कुटूंब हेच माझे मोठी संपत्ती आहेत.''

आफ्रिदीच्या या ट्विटनं एक त्याचं पितळ उघडं पडलं आहे. त्याच्या ट्विटनुसार जर तो ४४ वर्षांचा झाला असेल तर त्याचा जन्मसाल हा १९७७ असं होतं. विकिपिडीयावर त्याच जन्मसाल १९७५ असे आहे. त्यामुळे गोंधळ आणखी वाढला आहे.

आफ्रिदीच्या या ट्विटमुळ त्यानं इतकी वर्ष जगातील क्रिकेटपटूंची फसवणूक केल्याचेही उघड झाले आहेत. त्याच्या या ट्विटनुसार त्याचा जन्म आता १ मार्च १९८०सालचा नव्हे तर १ मार्च १९७७चा आहे.

यानुसार वन डे क्रिकेटमधील युवा शतकवीराचा विक्रम हा आफ्रिदीच्या नावावर नव्हे तर भलत्याच खेळाडूच्या नावावर जमा झाला पाहिजे.

आफ्रिदीनं १९९६साली श्रीलंकाविरुद्ध ३७ चेंडूंत १०० धावा चोपल्या होत्या आणि वन डेत शतक झळकावणारा तो ( 16 वर्ष २१७ दिवस) युवा फलंदाज ठरला होता. पण, त्याच्या आताच्या खुलाशानंतर १९९६साली त्याचं वय हे १९ वर्ष व २१७ दिवस इतकं असल्याचा दावा केला जात आहे.

त्यामुळे अफगाणिस्तानच्या उस्मान घानी ( १७ वर्ष व २४२ दिवस) याच्या नावावर वन डेत सर्वात जलद शतक करणाऱ्या युवा फलंदाजाचा विक्रम जातो. त्यानं जुलै २०१४ मध्ये हा पराक्रम केला होता.

आफ्रिदीनं २ ऑक्टोबर १९९६साली केनियाविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पण, त्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. मात्र, दुसऱ्या वन डे सामन्यात त्यानं श्रीलंकेविरुद्ध ३७ चेंडूंत शतक झळकावून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. आफ्रिदीनं २७ कसोटीत ३६.५१च्या सरासरीनं १७१६ धावा केल्या आणि ४८ विकेट्स घेतल्या. ३९८ वन डे सामन्यांत ८०४६ धावा व ३९५ विकेट्स त्याच्या नावावर आहेत. ९९ ट्वेंटी-२० सामन्यांत १४१६ धावा व ९८ विकेट्स त्यानं टिपल्या.