Cricket Buzz»फोटो गॅलरी »पाकिस्तानातल्या मंदिरात शाहिद आफ्रिदी करतोय जीवनावश्यक वस्तूंचं वाटपपाकिस्तानातल्या मंदिरात शाहिद आफ्रिदी करतोय जीवनावश्यक वस्तूंचं वाटप By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 5:57 PMOpen in App1 / 11कोरोना व्हायरसच्या संकटात अनेक दिग्गज स्वतः पुढाकार घेऊन गरजूंना मदत करत आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे रोजंदारीवर पोट असलेल्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.2 / 11पाकिस्तानातही लॉकडाऊनमुळे अनेकांचे हाल होत आहेत. पाकिस्तानातील गरजूंसाठी माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी आणि त्याची फाऊंडेशन मदत करत आहेत.3 / 11गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यासाठी आफ्रिदी स्वतः गावागावांत जात आहे. त्याच्या या समाजकार्याचं भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांनीही कौतुक केलं.4 / 11गरजूंना रेशन पुरवण्यासाठी आफ्रिदीनं ब्रँड्ससाठी मोफत काम करण्याचीही तयारी दर्शवली होती. ब्रँड्सनी माझ्यासोबत करार करावा, त्यांनी मला त्याचे पैसे देऊ नये. फक्त गरजूंना रेशन पुरवण्यासाठी मदत करावी, असं आवाहन आफ्रिदीनं केलं होतं.5 / 11याच मदतकार्याचा भाग म्हणून आफ्रिदीनं पाकिस्तानातील मंदिरात भेट दिली. हिंदू मंदिरात जाऊन आफ्रिदीनं गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं.6 / 11त्यानं लिहिलं की,''आम्ही सर्व एकत्र आहोत आणि या संकटावर एकत्रितपणे मात करू. ऐक्य ही आमची ताकद आहे. शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनचे अध्यक्षांसह मी आद येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिराला भेट दिली आणि तेथे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंच वाटप केलं.''7 / 11आफ्रिदीच्या या समाजकार्यात माजी स्क्वॉशपटू जहांगीर खान हेही मदत करत आहेत. 8 / 11पाकिस्तानातील अधिकाधिक गरजूंपर्यंत मदत पोहोचावी यासाठी आफ्रिदी आणि त्याची संस्था दिवसरात्र मेहनत करत आहे.9 / 11जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही 43 लाख 43,251 वर पोहोचली आहे. त्यापैकी 16 लाख 04,559 रुग्ण बरे झाले असले तरी 2 लाख 92, 913 जणांना प्राण गमवावे लागले आहेत.10 / 11पाकिस्तानातल्या कोरोना रुग्णांची संख्या 34336 इतकी झाली असून 8812 रुग्ण बरे झाले आहेत आणि 737 लोकांना प्राण गमवावे लागले आहेत.11 / 11 आणखी वाचा Subscribe to Notifications