Join us  

21 वर्षांपूर्वीचा 'तो' विक्रम तेंडुलकर-द्रविडच्या नावावर राहिला नाही, जाणून घ्या का

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2019 8:15 PM

Open in App
1 / 7

डुबलिन : वेस्ट इंडिजच्या शाय होप आणि जॉन कॅम्बेल या सलामीवीरांनी रविवारी भीमपराक्रमी कामगिरी केली. त्यांनी आयर्लंडविरुद्धच्या वन डे सामन्यात पहिल्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी करताना भारताच्या सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांचा 21 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.

2 / 7

आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात शाय होप आणि जॉन कॅम्बेल या विंडीजच्या सलामीवीरांनी वैयक्तिक शतक ठोकले. होप्स आणि कॅम्बेल यांनी आयर्लंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. वेस्ट इंडिज क्रिकेटच्या इतिहासात एका डावात सलामीवीरांनी शतक ठोकण्याची ही पहिलीच वेळ ठरली. होप आणि कॅम्बेलच्या फटकेबाजीच्या जोरावर विंडीजने 3 बाद 381 धावांचा डोंगर उभा केला.

3 / 7

होप्सचे हे वन डेतील पाचवे शतक ठरले, तर कॅम्बेलने कारकिर्दीतील पहिल्याच शतकाची नोंद केली. त्याने 99 चेंडूंत शतक ठोकले. यासह त्यांनी पहिल्या विकेटसाठी 250+ धावांची भागीदारी केली. त्यांनी 1997साली चंद्रपॉल व विलियम्स यांच्या 200 धावांचा ( वि. भारत) विक्रम मोडला.

4 / 7

कॅम्बेल 179 आणि होप 170 धावा करून माघारी परतले. वन डे क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच दोन्ही सलामीवीरांनी 170 धावांचा पल्ला गाठण्याचा पराक्रम केला.

5 / 7

आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये पहिल्या विकेटसाठी या जोडीनं 365 धावांची भागीदारी केली. या जोडीनं पाकिस्तानच्या इमान उल हक व फाखर जमान यांचा 304 धावांचा विक्रम मोडला. या दोघांनी 2018 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध हा विक्रम नोंदवला होता.

6 / 7

वन डे क्रिकेटमध्ये कोणत्याही विकेटसाठीचीही दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. होप व कॅम्बेल या जोडीला ख्रिस गेल व मार्लोन सॅम्युअल्स यांचा 372 धावांचा ( वि. झिम्बाब्वे, 2015) विक्रम मोडता आला नाही. मात्र, त्यांनी भारताच्या सचिन तेंडुलकर व राहुल द्रविड यांचा 331 ( वि. न्यूझीलंड, 1999) आणि राहुल द्रविड व सौरव गांगुली यांचा 318 ( वि. श्रीलंका, 1999) धावांचा विक्रम मोडला.

7 / 7

टॅग्स :वेस्ट इंडिजआयर्लंड