मैदानावर अनेक विक्रम करणाऱ्या वॉर्न मैदानाबाहेर त्याच्या कृतीने बदनामीत झाला होता. त्यामुळेच त्याला 'Bad Boy Of Cricket ' असे म्हटले जायचे.
ऑस्ट्रेलियाकडून जवळपास १५ वर्ष क्रिकेट खेळणाऱ्या शेन वॉर्नला पार्टीची खूप आवड होती. मीडिया रिपोर्टनुसार रात्रभर पार्टी करणाऱ्या वॉर्नची अनेकदा शेजाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रारही केली होती. त्यापैकी एकदा तर तो दोन सेक्स वर्करसोबत पकडला गेला होता. त्यानंतर त्याच्यावर जगभरातून टीकाही झाली होती.
शेन वॉर्नचे अनेक अफेअर्स झाले. त्याने एकदा तर आतापर्यंत १००० मुलींसोबत संबंध ठेवल्याचा दावा केला होता. ब्रिटेन- ऑस्ट्रेलियन पत्रकार पॉल बॅरीने वॉर्नच्या जीवनावर आधारीत स्पून आऊट हे पुस्तक लिहिले. त्यात वॉर्नने हा दावा केला होता. त्यापैकी केवळ पाच वेळाच पकडलो गेल्याचे त्याने सांगितले होते.
वॉर्नचे नाव अनेक ग्लॅमरस मॉडलसोबत जोडले गेले. ब्रिटनची अभिनेत्री लिज हार्ले त्यापैकी एक होती. आफ्रिकेच्या एका महिलेने वॉर्नवर छेडछाडीचे आरोप केले होते. असं सांगितलं जातं की एका वेळा वॉर्नच्या तीन तीन गर्लफ्रेंड होत्या.
२००६ मध्ये वॉर्नचे नाव सेक्स स्कँडलमध्ये अडकले. MTV प्रेझेंटर कॉरेली इंचोल्ट्ज व एम्मा सोबतचे न्यूड फोटो व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले होते.