Join us  

शाब्बास शार्दूल! क्रिकेटवरील प्रेमासाठी कारनं केला ७०० किलोमीटर प्रवास; जाणून घ्या कारण

By स्वदेश घाणेकर | Published: February 24, 2021 5:05 PM

Open in App
1 / 8

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताला कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात खारीचा वाटा उचलणाऱ्या शार्दूल ठाकूरची ( Shardul Thakur) याला इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत संघात स्थान मिळालं नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अॅडलेड कसोटीत उमेश यादव दुखापतग्रस्त झाला आणि शार्दूलला संधी मिळाली.

2 / 8

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत उमेश यादव तंदुरूस्त झाला अन् BCCIनं शार्दूल ठाकूरला रिलीज केलं. त्यामुळे राष्ट्रीय कर्तव्यातून मुक्त झालेल्या शार्दूलनं मुंबई संघाप्रती कर्तव्य पार पाडण्याचा निर्धार केला. त्यासाठी त्यानं अहमदाबाद ते जयपूर हा ७०० किलोमीटर अंतराचा पल्ला कारनं प्रवास केला.

3 / 8

उमेश यादवनं रविवारी मोटेरा स्टेडियमवर फिटनेस टेस्ट पास झाला आणि इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांसाठी त्याचा संघात समावेश केला गेला. त्यामुळे बीसीसीआयनं शार्दूल ठाकूरला विजय हजारे ट्रॉफीसाठी रिलीज केलं. ठाकूर मुंबई संघाचा सदस्य आहे.

4 / 8

सोमवारी तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी शार्दूलला रिलीज केलं गेलं आणि तो जयपूरला मुंबई संघासह सहभागी होण्यासाठी पोहोचला. त्यानं विमानानं न जाता कारनं हा प्रवास करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या या निर्णयाचे सर्वच कौतुक करत आहेत.

5 / 8

कोरोना व्हायरसमुळे विजय हजारे ट्रॉफीतही बायो बबल नियमांचं पालन करावं लागत आहे. शार्दूलला जेव्हा बीसीसीआयनं रिलीज केलं तेव्हा तो टीम इंडियाच्या बायो बबलमध्ये होता. त्याला पुन्हा मुंबईच्या बायो बबलमध्ये जायचे होते.

6 / 8

शार्दूलननं विमानानं प्रवास केला असता तर त्याला ८० मिनिटं लागली असती, परंतु त्याला तीन दिवसांसाठी क्वारंटाईन व्हावं लागलं असतं. त्यामुळे त्यानं कारनं जयपूर जाण्याचा निर्णय घेतला आणि तो मुंबईच्या पुढील सामन्यात खेळू शकणार आहे.

7 / 8

२२ फेब्रुवारीला सकाळी पाच वाजता शार्दूलनं कारनं प्रवास सुरू केला आणि दहा तासानंतर तो जयपूरला पोहोचला, असे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिन संजय नाईक यांनी सांगितले.

8 / 8

शार्दूलनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ब्रिस्बन कसोटीत ७ विकेट्स अन् ६७ धावांची खेळी केली होती.

टॅग्स :शार्दुल ठाकूरमुंबई