भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन किती बिनधास्त आहे, हे सर्वांना माहित आहे. आपल्या मुलांसोबतची त्याची मस्ती सोशल मीडियावर सर्वच पाहतात.
टीम इंडियाचा गब्बर जास्तकरून त्याचा मुलगा जोरावर याच्याबरोबर नेहमी चर्चेत असतो. पण, त्याची 20 वर्षांची मुलगी आलिया धवन हिनं समाजकार्य करून आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
शिखर धवनची पत्नी आयशा मुखर्जी हिला पहिल्या लग्नातून दोन मुली आहेत. आयशानं 2012मध्ये शिखर सोबत लग्न केलं आणि या दोघांना जोरावर हा मुलगा आहे.
लग्नानंतर धवननं आयशाच्या दोन्ही मुलींना आपलं नाव दिलं. या मुलींसोबत धवनचं घट्ट नातं आहे. त्यामुळे त्या सावत्र मुली आहेत, हे कुणी म्हणणार नाही.
बॉयफ्रेंडसोबत मुंडन केल्यामुळे आलिया चर्चेत आली होती.
तिनं कॅन्सरग्रस्तांच्या समर्थनात आणि निधी गोळा करण्यासाठी मुंडन केलं होतं आणि त्यासाठी तिचं कौतुकही झालं होतं.
धवन आणि आयशा यांनी मुलीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून तिचा अभिमान वाटत असल्याचे सांगितले होते.