नव्या लीगमध्ये एन्ट्री! त्यामुळं गब्बर IPL मधूनही 'आउट'

निवृत्तीनंतर तो आयपीएलमध्ये एखादा हंगाम खेळताना दिसेल, असे वाटत होते. पण

शिखर धवन याने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. पण यानंतर तो आयपीएल खेळणार का? असा प्रश्नही काही चात्यांच्या मनात होता.

निवृत्तीनंतर तो आयपीएलमध्ये एखादा हंगाम खेळताना दिसेल, असे वाटत होते. पण त्यानं या लोकप्रिय लीगलाही टाटा बाय बाय केलं आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकारांचा विक्रम नावे असणारा शिखर धवन गत हंगामात पंजाब किंग्सचा कॅप्टन होता.

पंजाबशिवाय (२०२२-२४) शिखर धवन डेक्कन चार्जर्स (२०११-११२), सनरायझर्स हैदराबाद (२०१३-१८), दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना पाहायला मिळाले होते.

पण आता तो या लोकप्रिय स्पर्धेत दिसणार नाही. कारण त्याने नव्या लीगमध्ये एन्ट्री केली आहे. तो आता लीजेंड्स लीग क्रिकेटशी कनेक्ट झालाय.

शिखर धवनने निवृत्तीनंतर दिग्गज क्रिकेटर्सच्या लीगमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केल्यामुळे तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

नव्या लीगमध्ये सामील होऊन जुन्या सवंगड्यांसोबत पुन्हा क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी उत्सुक आहे, असे धवनने म्हटले आहे.

सचिन तेंडुलकरपासून ते अगदी विरेंद्र सेहवागपर्यंत अनेक स्टार क्रिकेटर या लीगच्या माध्यमातून क्रिकेटशी कनेक्ट आहेत. या क्लबमध्ये आता धवनही सामील झालाय.