Join us

ही दोस्ती तुटायची नाय! आठवणींचे साक्षीदार; यशाचे 'शिखर' गाठणारी जोडी, रोहितची 'भारी' पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 14:28 IST

Open in App
1 / 10

कर्णधार रोहित शर्मा आणि माजी खेळाडू शिखर धवन यांची जोडी क्रिकेट विश्वाला प्रभावित करून गेली. त्यांची मैत्री जगजाहीर आहे. नुकताच गब्बर धवन आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्त झाला.

2 / 10

शांत, संयमी आणि निर्भय खेळीसाठी ओळखला जाणारा भारतीय क्रिकेटचा 'गब्बर' अर्थात शिखर धवन शनिवारी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्त झाला. आजी माजी खेळाडूंनी त्याला शुभेच्छा दिल्या.

3 / 10

भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी रविवारी शुभेच्छा दिल्या. रोहितने आठवणी सांगत आपल्या सहकाऱ्याला शुभेच्छा दिल्या.

4 / 10

रोहितने शिखरसाठी लिहिले की, रूममधील सहकारी ते मैदानातील आयुष्यभराच्या आठवणी... तू दुसऱ्या टोकाला राहून नेहमीच माझे काम अधिक सोपे केले आहेस... द अल्टीमेट जॅट.

5 / 10

रोहितच्या पोस्टवर व्यक्त होताना शिखरने म्हटले की, आपला प्रवास खूपच सुंदर राहिला भाई, याला खूप सुंदर केल्याबद्दल तुझे आभार.

6 / 10

धवन शेवटच्या वेळी डिसेंबर २०२२ मध्ये टीम इंडियातून खेळला होता. बांगलादेशविरूद्धचा वन डे सामना धवनच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरला.

7 / 10

शिखर धवनने आपला पहिला कसोटी सामना १४ मार्च २०१३ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. मोहालीच्या मैदानात डावाची सुरुवात करताना त्याने ८५ चेंडूत शतक झळकावून सर्वांनाच प्रभावित केले.

8 / 10

पदार्पणाच्या सामन्यातील या झंझावाती खेळीसह पदार्पणाच्या कसोटीत जलद शतकी खेळी करण्याचा विक्रम धवनने आपल्या नावे केला. हा एक विश्विक्रम आजही कायम आहे. मोहाली कसोटीत त्याने १७४ चेंडूत १८७ धावांची खेळी केली होती.

9 / 10

दरम्यान, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील शिखर धवनची खेळी आजही चाहत्यांच्या मनात ताजी आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर राहिला होता.

10 / 10

टॅग्स :शिखर धवनरोहित शर्माभारतीय क्रिकेट संघआंतरराष्ट्रीय क्रिकेट