Join us  

ICC World Cup 2023: पुढील वर्षी भारतात येणार पाकिस्तानची टीम? शोएब म्हणाला, “आता तिकडेच वर्ल्डकप…”

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 8:36 AM

Open in App
1 / 6

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर २०२२च्या विश्वचषकाचा अंतिम सामना पार पडला. इंग्लंडने पाच गडी राखून पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि विश्वचषकावर नाव कोरले. पाकिस्तानच्या ८ बाद १३७ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने १९ षटकांत ५ बाद १३८ धावा केल्या.

2 / 6

आदिल राशिद, स‌ॅम करन, ख्रिस जॉर्डन या गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर बेन स्टोक्सने ४९ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारांसह नाबाद ५२ धावा  करून इंग्लंडचा विजय पक्का केला. एकदिवसीय आणि टी-२० असे दोन्ही वर्ल्ड कप जेतेपद एकाच वेळी कायम राखणारा पहिला संघ ठरला. पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर संघाचा माजी खेळाडू शोएब अख्तरने पाकिस्तानी संघाला धीर देण्याचा प्रयत्न केला. 

3 / 6

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १३७ धावा केल्या होत्या. इंग्लंडला टी-२० विश्वचषकाचा नवा चॅम्पियन होण्यासाठी १३८ धावांची आवश्यकता होती. बेन स्टोक्सने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लिश संघाने किताब पटकावला आहे. पाकिस्तानी संघाचा माजी खेळाडू शोएब अख्तरने इंग्लंडच्या खेळाडूंचे कौतुक केले आहे. 

4 / 6

पाकिस्तानी संघ अंतिम सामन्यात पराभूत झाला आहे. यामुळे निराशा आहे. परंतु पुढील वर्षी भारतात विश्वचषक जिंकू, असं शोएबनं एका व्हिडीओत म्हटलंय. यावर पुढील वर्षी भारतात होणाऱ्या विश्वचषक सामन्यात पाकिस्तानचा संघ भारतात येईल आणि स्पर्धेत सहभागी होईल अशी आशा आहे.

5 / 6

“शाहिन दुखापतग्रस्त होणं हा टर्निंग पॉईंट होता. परंतु मान खाली घालण्यासारखं काही नाही. असं होतं. जेव्हा बेन स्टोक्सने ५ षटकार खाऊन २०१६ मध्ये विश्वचषक गमावला होता, त्यानेच २०२२ मध्ये विजय मिळवून दिला. निराश आहे, परंतु आपण भारतात विश्वचषक हाती घेऊ,” असेही तो म्हणाला.

6 / 6

'पाकिस्तानने विश्वचषक हरला असला तरी त्यांनी शानदार कामगिरी केली आहे. पाकिस्तानची गोलंदाजी शानदार होती, चमकदार कामगिरी केल्यामुळे विश्वचषक अविस्मरणीय झाला. शाहिन शाह आफ्रिदी बाहेर झाला तोच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. त्रास होत आहे, निराश आहे पण चांगली खेळी केल्याबद्दल अभिनंदन.' अशा शब्दांत अख्तरने पाकिस्तानी संघाचे देखील कौतुक केले आहे.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२पाकिस्तानइंग्लंडभारत
Open in App