सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या बातम्या मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. अशातच सानिया आणि शोएबच्या मौनाने या बातम्यांना खतपाणी घातले होते. मात्र, आता यावर पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरने भाष्य केले आहे. शोएब मलिकने सानिया मिर्झाशी घटस्फोट ही वैयक्तिक बाब असल्याचे सांगितले.
अलीकडेच शोएबने एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सानिया मिर्झापासून घटस्फोट घेण्याबाबत सुरू असलेल्या अटकळींबद्दल भाष्य केले. याविषयी बोलताना शोएब मलिक म्हणाला की, त्याच्या वैयक्तिक बाबींमध्ये माध्यमांच्या सततच्या हस्तक्षेपामुळे तो नाराज आहे.
द एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या रिपोर्टनुसार, शोएब मलिकने म्हटले, 'ही आमची वैयक्तिक बाब आहे. या प्रश्नाचे उत्तर मी किंवा माझी पत्नी देत नाही. या विषयाला स्वतंत्र सोडा.' काही दिवसांपूर्वी मीडियाच्या रिपोर्ट्समध्ये असे सांगितले होते की सानिया आणि शोएब आधीच वेगळे राहत होते आणि त्यांनी घटस्फोटाची औपचारिकता करण्यासाठी कायदेशीर मार्ग स्वीकारला होता.
याशिवाय हे देखील सांगण्यात आले होते की, सानियाने शोएबला फसवताना पकडले आणि त्याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मात्र, पाकिस्तानी मीडियानुसार असे देखील म्हटले जात आहे की या स्टार कपलचा आधीच घटस्फोट झाला आहे. पाकिस्तानमधील शोएबच्या मॅनेजमेंट टीमच्या जवळच्या सूत्राने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच सानिया आणि शोएब यांनी 'द मिर्झा मलिक शो'नावाच्या शोची घोषणा केली. दोघांनी त्यांच्या शोची घोषणा केल्यानंतर, अशा बातम्या समोर आल्या की त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे त्यांना घटस्फोट जाहीर करण्यापासून रोखले गेले. रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले आहे की, शोएब आणि सानिया अधिकृतपणे वेगळे होण्याआधी शोचे सर्व भाग शूट करण्याचा करार झाला होता.
मात्र शोएब आणि सानिया वेगळे होण्याचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. अनेक गॉसिप कॉलममध्ये लिहले आहे की, शोएब मलिकचे प्रसिद्ध पाकिस्तानी मॉडेल आणि अभिनेत्री आयशा उमरसोबत अफेयर आहे. ज्याची माहिती सानियाला मिळाली. या वर्षाच्या सुरूवातीला शोएब आणि आयशा यांचे फोटो देखील व्हायरल झाले होते.
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी 12 एप्रिल 2010 रोजी लग्न केले होते. सानिया आणि शोएबचा मुलगा इझान मिर्झा मलिकचा जन्म लग्नाच्या 8 वर्षानंतर झाला. सानिया आणि शोएब लग्न झाल्यापासून दुबईत राहत आहेत. काही दिवसांपूर्वी सानियाने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला दुबईत राहून जवळपास 10 वर्षांहून अधिक काळ झाला आहे.