पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकने भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झापासून वेगळे झाल्यानंतर तिसऱ्यांदा लग्न केलं आहे. शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिला आपलं जोडीदार बनवलं आहे. सना ही शोएब मलिकची तिसरी पत्नी आहे. शोएब मलिकने याआधी आएशा सिद्धिकी आणि सानिया मिर्झा यांच्याशी विवाह केले होते. मात्र तीन विवाहा करणारा शोएब मलिक हा काही पहिलाच क्रिकेटपटू नाही आहे. याआधीही काही क्रिकेटपटूंनी तीन तीन लग्नं केली आहे.
श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या याने तीन लग्नं केली आहेत. जयसूर्याचा पहिला विवाह १९९८ मध्ये झाला होता. मात्र वर्षभरातच त्याचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर सांद्रा डीसिल्व्हा हिच्याशी जयसूर्यानं दुसरं लग्न केलं होतं. जयसूर्याचं हे नातंही फार काळ टिकलं नाही. २०१२ मध्ये त्यांचा घटस्फोट धाला होता. त्यानंतर जयसूर्याने मलिका सिरिसेना हिच्यासोबत तिसरा विवाह केला. मात्र सुरुवातीला याची माहिती फारच थोड्या लोकांना झाली होती.
पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान यांचाही तीन विवाह केलेल्या खेळाडूंमध्ये समावेश आहे. इम्रान खान यांनी १९९५ मध्ये जेमाइमा गोल्डस्मिथ सोबत पहिल्यांदा निकाह केला होता. २००४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर इम्रान खान यांनी रेहम खान हिच्याशी लग्न केलं. २०१८ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २०१८ मध्ये इम्रान खान यांनी बुशरा मानेक हिच्याशी तिसरा विवाह केला.
मोहम्मद अझरुद्दीन भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांच्याही नावाचा तीन विवाह केलेल्या क्रिकेटपटूंमध्ये समावेश होतो. मोहम्मद अझरुद्दीन यांचा पहिला विवाह नौरिन हिच्याशी झाला होता. मात्र संगीता बिजलानीच्या प्रेमात पडल्यावर अझरुद्दीन यांनी नौरिनला तलाक दिला होता. नंतर अझरुद्दीन आणि संगीता बिजलानी यांनी विवाह केला. मात्र २०१० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. नंतर अझरुद्दीन यांनी शेनॉन मेरीसोबत लग्न केल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. मात्र अझरुद्दीन यांनी ही अफवा असल्याचे सांगत हे वृत्त फेटाळले होते. मात्र तोपर्यंत त्यांचे खूप फोटो व्हायरल झाले होते.