Join us  

IND vs NZ Test: पदार्पणाच्या सामन्यातच श्रेयस अय्यरकडून किवींची धुलाई, शतक ठोकून रचले पाच विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 1:42 PM

Open in App
1 / 13

पहिला विक्रम म्हणजे श्रेयर अय्यर हा पदार्पणाच्या सामन्यात शतक ठोकणारा १६ वा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्यापूर्वी पृथ्वी शॉ नं शतक ठोकलं होतं. २०१८ मध्ये पृथ्वीनं पदार्पणाच्या सामन्यात शतक ठोकलं होतं.

2 / 13

विशेष म्हणजे भारतीय संघात पदार्पण करताना मागील तीन शतकं ही मुंबईच्याच फलंदाजांनी केली आहेत. यामध्ये रोहित शर्मा, त्याच्यानंतर पृथ्वी शॉ आणि आता श्रेयस अय्यर यांच्या नावांचा समावेश आहे. अय्यरनं आपल्या शतकासोबतच पाच नवे रेकॉर्ड कायम केले आहेत.

3 / 13

ND vs NZ , 1st Test Upadets : पदार्पणाच्या सामन्यातच श्रेयस अय्यरनं ( Shreyas Iyer) कानपूर कसोटीत शतक झळकावत इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिलं शतक झळकावलं. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.

4 / 13

दुसरा म्हणजे न्यूझीलंडविरोधात पदार्पण करत शतक ठोकणारा श्रेयस अय्यर हा तिसरा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी १९७६ मध्ये सुरिंदर अमरनाथ यांनी आणि १९५५ मध्ये एजी कृपाल सिंह यांनी न्यूझीलंडविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात शतक ठोकलं होतं.

5 / 13

सुरिंदर अमरनाथ यांनी ऑकलंडमध्ये १२४ धावा ठोकल्या होत्या. तर एजी कृपाल सिंग यांनी १९५५ मध्ये हैदराबादमध्ये नाबाद १०० धावा आणि आता श्रेयर अय्यरनं कानपूरमध्ये १०५ धावा ठोकल्या.

6 / 13

तिसरा विक्रम म्बणजे पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच डावात शतक ठोकणारा श्रेयस अय्यर हा १३ वा भारतीय फलंदाज आहे. चौथा विक्रम म्हणजे देशांतर्गत कसोटी सामन्यात पदार्पण करताना शतक ठोकणारा अय्यर हा १० वा खेळाडू ठरला आहे. तर पाचवा विक्रम म्हणजे कानपूरच्या मैदानावर पदार्पणात शतक ठोकणारा श्रेयस अय्यर हा दुसरा खेळाडू ठकला आहे. यापूर्वी गुंडप्पा यांनी १९६९ मध्ये हा विक्रम आपल्या नावे केल्या.

7 / 13

पदार्पणवीर श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा आणि शुबमन गिल यांच्या वैयक्तिक अर्धशतकी खेळीनंतर टीम इंडियानं कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी ४ बाद २५८ धावा केल्या. न्यूझीलंडच्या कायले जेमिन्सननं तीन विकेट्स घेत टीम इंडियाला सुरुवातीला धक्के दिले. मयांक अग्रवाल ( १३) झेलबाद झाला.

8 / 13

शुबमन व चेतेश्वर पुजारा यांनी दुसऱ्या विकेटसाठी १३३ चेंडूंत ६१ धावा जोडल्या. शुबमनला ५२ धावांवर माघारी फिरावे लागले. पुजारा व अजिंक्य रहाणे ही अनुभवी जोडी कमाल करेल असे वाटत होते, परंतु पुजारा २६ आणि अजिंक्य ३५ धावांवर बाद झाला. अय्यर आणि जडेजा या जोडीनं किवी गोलंदाजांना दाद दिली नाही. या दोघांनी शतकी भागीदारी केली.

9 / 13

दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीच्या षटकातच टीम साऊदीनं ही जोडी तोडली. अम्पायर कॉलमुळे जीवदान मिळालेला रवींद्र जडेजा ५० धावांवर त्रिफळाचीत झाला. शुबमन गिल व अजिंक्य रहाणे यांच्याप्रमाणेच चेंडू जडेजाच्या बॅटीला लागून यष्टींवर आदळला. जडेजा बाद झाल्यानंतर श्रेयसनं आक्रमक खेळ केला.

10 / 13

श्रेयस १७१ चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांसह १०५ धावांवर माघारी परतला. वृद्धीमान सहा ( १) व अक्षर पटेल ( ३) हेही टीम साऊदीच्या गोलंदाजीवर बाद झाले. भारताचे ८ फलंदाज ३१३ धावांवर माघारी परतले.

11 / 13

मुलानं कसोटी क्रिकेट खेळावं ही त्यांची इच्छा होती आणि त्याच्या पदार्पणानं ती पूर्ण झाली. त्यात कानपूर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी श्रेयसनं शतक झळकावून दिग्गजांच्या पंक्तित स्थान पटकावलं. कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा भारतीय फलंदाज ठरला. पण, मागील दोन वर्ष श्रेयससाठी खूप कष्टाची राहिली आणि आजच्या शतकानंतर त्याला मेहनतीचं फळ मिळालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

12 / 13

भारतात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेत श्रेयसला सराव करताना दुखापत झाली. त्यानंतर खांद्यावरील शस्त्रक्रियेमुळे तो बराच काळ क्रिकेटपासून दूर होता. त्याला आयपीएल २०२१च्या पहिल्या पर्वाला मुकावे लागले. त्याचमुळे दिल्ली कॅपिटल्सचं कर्णधारपदही त्याच्याकडून गेलं.

13 / 13

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात त्यानं चांगला खेळ केला, परंतु तरीही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या १५ सदस्यीय संघात त्याला स्थान मिळाले नाही. पण, आज कसोटी पदार्पणात शतक झळकावून त्यानं त्याची दखल घेण्यास जगाला भाग पाडलं आहे.

टॅग्स :श्रेयस अय्यरभारतीय क्रिकेट संघन्यूझीलंड
Open in App