टीम इंडियाच्या यशाचं अय्यरलाही द्यावे लागेल 'श्रेय'! भावाच्या खेळीनंतर बहिण श्रेष्ठाची इन्स्टा पोस्ट चर्चेत

भारत-न्यूझीलंड यांच्यातील लढतीनंतर श्रेयस अय्यरची बहिण श्रेष्ठाच्या खास फोटोंनी वेधलं लक्ष

भारतीय संघानं न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात दिमाखात विजय मिळवला. या सामन्यात'पंजा' मारुन सामना फिरवण्यात वरुण चक्रवर्तीनं मोठा वाटा उचलला अन् त्याने मॅन ऑफ द मॅचही मिळवली. पण या विजयात श्रेयस अय्यरचं श्रेयही कमी लेखता कामा नये.

न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत ३० धावांवर ३ विकेट गमावल्या असताना श्रेयस अय्यरनं चिवट खेळी करत फिफ्टी झळकावून संघाचा डाव सावरला. त्याच्या खेळीच्या जोरावरच भारतीय संघाने न्यूझीलंड विरुद्धची लढाई २०० पारची केली.

अय्यरच्या दमदार खेळीशिवाय भारतीय संघाच्या विजयानंतर सोशल मीडियावर क्रिकेटरची बहिण श्रेष्ठानं शेअर केलेल्या खास इन्स्टा स्टोरीची चर्चा रंगताना दिसतेय. भावाच्या क्लास इनिंगचा फोटो खास कॅप्शनसह शेअर करत तिने आनंद व्यक्त केलाय.

वेड्या बहिणीची वेडी माया अन् माउलीची छाया दाखवणारी छबीही तिच्या इन्स्टा पोस्टचा भाग आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यानंतर अय्यरच्या आईचा आनंद अगदी गगनाला भिडला होता. श्रेष्ठानं आईचा आनंद व्यक्त करण्याचा खास अंदाज दाखवणारा फोटोही शेअर केला आहे.

श्रेयस अय्यरची बहिण श्रेष्ठा ही नेहमीच आपल्या भावाला चीअर करण्यासाठी मॅचवेळी स्टेडियमवर उपस्थितीत राहून लक्षवेधून घेत असते.

भावाला चीअर करताना मैदानातील तिचा अंदाज अन् भावावरील प्रेम दाखवण्याची हटके स्टाईलही चर्चेचा विषय ठरताना दिसते.

श्रेष्ठा आपल्या स्टायलिश अंदाजाची जादू दाखवण्यातही कमी नाही. आपल्या या खास अदाकारीनं सोशल मीडियावर तिने चांगला चाहतावर्गही कमावला आहे.

मॅच बघायला आली अन् तिने पोस्ट शेअर नाही केली, असं कधीच होत नाही.