Join us  

Sara Tendulkar And Shubman Gill: शुभमन गिल आणि सारा सचिन तेंडुलकरचं ब्रेकअप झालं? ‘या’ फोटोमुळे रंगलीय चर्चा, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2021 8:06 PM

Open in App
1 / 10

गेल्या काही दिवसांपासून उदयोन्मुख क्रिकेटपटू शुभमन गिल (Shubman Gill) आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची कन्या सारा सचिन तेंडुलकर (Sara Tendulkar) यांचे अफेअर असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे. युएईमधील आयसीसी टी-२० वर्ल्डकप सुरू असून, यासाठी निवडण्यात आलेल्या संघात युवा क्रिकेटपटू शुभमन गिल याची निवड करण्यात आलेली नाही.

2 / 10

आयपीएलच्या १४व्या हंगामातील दुसऱ्या सत्रानंतर गिल भारतात परतला. सध्या तो कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे. शुभमन गिल आणि सारा सचिन तेंडुलकर इन्स्टाग्रामवर एकमेकांना फॉलो करत असून, अनेक एकमेकांच्या पोस्टही लाइक करतात. (Sara Tendulkar And Shubman Gill)

3 / 10

तसेच सारा आणि शुभमन यांनी अनेकदा एकसारख्या पोस्ट शेअर केल्या आहेत. यावरून चाहत्यांना दोघांच्यात अफेअर सुरू असल्याची चर्चा आहे.

4 / 10

शुभमनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन फोटो पोस्ट केल्याने पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांमध्ये त्याच्या आणि सारा तेंडुलकरच्या कथित नात्याची चर्चा सुरु झालीय. सचिनची मुलगी असणाऱ्या सारा तेंडुलकरसोबतच शुभमनचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा आता रंगत आहेत.

5 / 10

सौंदर्याच्या बाबतीत सारा अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत असल्याचे तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिल्यावर दिसून येते. सचिनची लेक सारा ही शिक्षणासाठी लंडनमध्ये असते. मात्र ती सोशल नेटवर्किंगवर प्रचंड सक्रीय आहे. तिचे इन्स्टाग्रामवर १५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

6 / 10

शुभमनचे नाव अनेकदा सचिन तेंडुकलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत जोडले जाते. या दोघांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगताना दिसतात. मात्र, दोघांनी कधीही सार्वजनिकपणे याबद्दल भाष्य केलेले नाही.

7 / 10

सारा ही शुभमन आणि त्याच्या बहिणीला इन्स्टाग्रामवर फॉलो करते. शुभमन गिलने केलेल्या एका पोस्टमुळे पुन्हा एकदा या दोघांच्या नावाची चर्चा चांगलीच रंगली आहे. शुभमन गील याने एक फोटो शेअर केला आहे.

8 / 10

शुभमनने स्वत:चा आरशात पाहतानाच एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमधील टी शर्टवर म्हटले आहे की, परींच्या प्रेमात पडू नका. हा फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये Sigma rule no.1 असे म्हटले आहे.

9 / 10

हा फोटो पाहून शुभमनचे साराबरोबर ब्रेकअप झाले आहे का, असा प्रश्न चाहत्यांना पडल्याचं दिसत आहे. शुभमनच्या या फोटोमधील कॅप्शनऐवजी त्याने घातलेला टी-शर्टच जास्त चर्चेत आहे. एका चाहत्याने बाहुबलीमधील संवादाच्या आधारे डिंडोरा पिटवा दो मामा गिलचं ब्रेकअप झालं आहे, अशी कमेंट केली आहे.

10 / 10

आता शुभमनला खरोखरच यामधून काही सांगायचं आहे की चाहत्यांनी भलताच अर्थ काढलाय हे शुभमनलाच सांगता येईल. सारा लाइमलाइटपासून लांब असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते त्यामुळे ती आता या फोटोवर काही कमेंट करते हा याबद्दलही काही चाहत्यांना उत्सुक्ता लागून राहिलेली आहे.

टॅग्स :शुभमन गिलसारा तेंडुलकर
Open in App