Join us  

IND vs AUS: "मेरिटच्या आधारे शुबमन गिललाच संधी मिळायला हवी", रवी शास्त्री यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 3:08 PM

Open in App
1 / 11

सध्या भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिले 2 सामने जिंकून यजमान भारतीय संघाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

2 / 11

खरं तर पहिल्या दोन्हीही सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केला. दोन्हीही सामन्यात फिरकीपटू गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. मात्र, भारतीय फलंदाजांना साजेशी फलंदाजी करता आली नाही.

3 / 11

सलामीवीर लोकेश राहुलवर खराब फॉर्ममुळे त्याच्यावर टीका होत आहे. भारताचा माजी खेळाडू व्यंकटेश प्रसाद आणि समालोचक आकाश चोप्रा यांच्यात तर राहुलच्या फॉर्मववरून वाद रंगला आहे. त्यामुळे आगामी तिसऱ्या सामन्यात राहुलच्या खेळीकडे विशेष लक्ष असणार आहे.

4 / 11

मात्र, तिसऱ्या कसोटी सामन्यात शुबमन गिलला संधी मिळायला हवी, असे भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटले आहे. भारताचा सलामीवीर लोकेश राहुल सध्या खराब फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे त्याच्या जागी गिलला संधी द्यायला हवी असे शास्त्री यांनी अप्रत्यक्षपणे म्हटले.

5 / 11

तिसऱ्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये शुबमन गिलला संधी द्या असा सल्ला शास्त्रींनी दिला. शास्त्रींच्या मते, आता गिलला खेळण्याची संधी मिळायला हवी, मग त्याने परफॉर्म करो किंवा नको.

6 / 11

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील तिसरा सामना 1 मार्चपासून इंदूर येथे खेळवला जाणार आहे. त्यामुळे या सामन्यात कर्णधार रोहित शर्मासोबत डावाची सुरूवात कोण करणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

7 / 11

या मालिकेला सुरूवात होण्याआधी शुबमन गिल चांगल्या लयनुसार खेळत होता. अशा स्थितीत राहुलच्या जागी फॉर्मात असलेल्या शुबमन गिलला उर्वरित सामन्यांमध्ये संधी मिळावी, असे अनेक माजी खेळाडूंनी म्हटले आहे.

8 / 11

तिसऱ्या सामन्याच्या पार्श्वभूमीवर शास्त्रींनी म्हटले, 'शुबमन गिलने धावा केल्या किंवा नाही केल्या, फॉर्ममध्ये असला किंवा नसला, तरी मेरिटच्या आधारावर संघात स्थान मिळवण्यासाठी तो पात्र आहे. जेव्हा तुमच्याकडे असा खेळाडू आहे की जो अशी दमदार कामगिरी करत असेल तर त्याला संधी का मिळत नाही असा प्रश्न संघातील अनेक खेळाडूंना पडतो.'

9 / 11

दरम्यान, खरं सांगायचे तर खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये हा विचार करत असतील. मला ही ड्रेसिंग रुम चांगली माहिती आहे आणि गिल हा चांगला खेळाडू का आहे हे खेळाडूंना माहीत आहे, असे शास्त्री यांनी अधिक सांगितले.

10 / 11

लोकेश राहुल सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. त्याच्या शेवटच्या कसोटी शतकानंतर लोकेश राहुलची सरासरी 15.90 आहे, ज्यामुळे संघ व्यवस्थापनासाठी त्याला पाठिंबा देणे आव्हानात्मक झाले आहे. भारतीय संघ 1 मार्चपासून इंदूर येथे तिसरा कसोटी सामना खेळणार आहे.

11 / 11

तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियालोकेश राहुलशुभमन गिलरवी शास्त्रीभारतीय क्रिकेट संघ
Open in App