Join us  

Shweta Sehrawatने द्विशतक झळकावून मानधनाला मागे टाकले, थोडक्यात वाचला रोहितचा वर्ल्ड रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2024 3:30 PM

Open in App
1 / 5

भारतीय महिला क्रिकेटची भविष्याची स्टार खेळाडू श्वेता सेहरावतने ( Shweta Sehrawat ) देशांतर्गत क्रिकेटमध्ये द्विशतकी खेळी केली. सीनियर महिला वन डे ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून खेळताना तिने द्विशतक झळकावले आणि वादळ निर्माण केले. या खेळीसह श्वेताने स्मृती मानधनाचा विक्रम मोडला.

2 / 5

नागालँडविरुद्ध खेळताना दिल्लीची सलामीवीर श्वेता सेहरावतने १५० चेंडूत २४२ धावांची स्फोटक खेळी खेळली. या खेळीत श्वेताने ३१ चौकार आणि ७ षटकार खेचले. दिल्लीने नागालँडविरुद्ध ४५५ धावा केल्या. लिस्ट ए कारकिर्दीत द्विशतक झळकावणारी श्वेता पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली.

3 / 5

याशिवाय, ती सर्व प्रकारच्या अधिकृत क्रिकेटमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या करणारी महिला क्रिकेटपटू बनली आहे. श्वेताच्या आधी स्मृती मानधनानेही द्विशतक झळकावले आहे, परंतु तिने १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये ही खेळी केली होती. श्वेताने सीनियर क्रिकेटमध्ये लिस्ट ए मध्ये द्विशतक झळकावले आहे.

4 / 5

या खेळीनंतरही श्वेताची लिस्ट-एमधील भारताकडून सर्वात मोठी धावसंख्या उभारण्याची संधी हुकली. सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहितने श्रीलंकेविरुद्ध २६४ धावा केल्या होत्या. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारताने नागालँडचा ४०० धावांनी पराभव केला. नागालँडचा संपूर्ण डाव 55 धावांत आटोपला.

5 / 5

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत श्वेताने ६ इनिंग्जमध्ये १४६च्या सरासरीने २९२ धावा केल्या होत्या आणि तिचा स्ट्राईक रेट हा १४१+ होता.

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघरोहित शर्मास्मृती मानधना