Join us

पाकिस्तानच्या 'या' सहा क्रिकेटपटूंचे होते बॉलीवूडच्या अभिनेत्रींशी अफेअर, पुढे काय झालं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 20:21 IST

Open in App
1 / 6

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज वसिम जाफरचे मिस वर्ल्ड झालेल्या सुश्मिता सेनबरोबर अफेअर असल्याची चर्चा होती. पण या दोघांनी लग्न न करण्याच निर्णय घेतला आणि त्यानंतर अक्रमने शनेरियाबरोबर दुसरं लग्न केलं.

2 / 6

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आणि रावळपिंडी एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असलेल्या शोएब अख्तरचे सोनाली बेंद्रेबरोबर असल्याचे बोलले जात होते. या दोघांचे २००४ साली हे अफेअर सुरु होते, असे म्हटले जाते.

3 / 6

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दूल रझाकचे तमन्ना या अभिनेत्रीबरोबर अफेअर होते. दुबई येथे एका जाहीरातीदरम्यान या दोघांची भेट झाली होती. त्यानंतर या दोघांचे अफेअर सुरु झाले, असे म्हटले जाते.

4 / 6

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू मोहसिन खान यांचे रीना रॉयबरोबरचे अफेअर चांगलेच गाजले होते. या दोघांनी लग्नही केले होते. पण हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही.

5 / 6

पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि विद्यमान पंततप्रधान इम्रान खान यांचे झीनत अमानबरोबर अफेअर होते. पण कालांतराने त्यांच्यामध्ये भांडणे व्हायला लागली आणि ते दोघे या नात्यामधून बाहेर पडले.

6 / 6

पाकिस्तानचे माजी कर्णधार झहीर अब्बास यांचे रीटा लुथ्राबरोबर अफेअर होते. या दोघांनी लग्नही केले. रीटा यांनी लग्नानंतर आपला धर्म बदलला. रीटा यांनी लग्नानंतर इस्लाम धर्म स्वीकारला आणि शमिना अब्बास असे आपले नाव ठेवले.

टॅग्स :इम्रान खानवसीम अक्रमसोनाली बेंद्रेसुश्मिता सेनशोएब अख्तरझीनत अमान