SL vs IND : रोहित-विराटची जोडी सज्ज; Team India ची जोरात तयारी; अय्यर-राहुलची एन्ट्री, PHOTOS

sl vs ind odi series : २ ऑगस्टपासून वन डे मालिकेचा थरार.

श्रीलंकेविरूद्धच्या वन डे मालिकेतून लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर टीम इंडियात पुनरागमन करणार आहेत. भारत आणि श्रीलंका यांच्यात २ ऑगस्टपासून वन डे मालिका खेळवली जात आहे.

नुकतीच तीन सामन्यांच्या या मालिकेसाठी यजमान श्रीलंकेच्या संघाची घोषणा झाली आहे. ट्वेंटी-२० मालिका गमावणाऱ्या श्रीलंकेसमोर वन डे मालिका जिंकण्याचे मोठे आव्हान आहे.

भारतीय संघ कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात असेल. या मालिकेतून विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर आणि इतर काही खेळाडूंचे पुनरागमन होणार आहे.

२ ऑगस्ट रोजी सलामीचा सामना खेळवला जाईल, त्यानंतर ४ आणि ७ तारखेला अनुक्रमे दुसरा आणि तिसरा सामना होईल.

बीसीसीआयने टीम इंडियाच्या तयारीची झलक शेअर केली आहे. यामध्ये कर्णधार रोहित शर्मासह इतर खेळाडू सराव करत असल्याचे दिसते.

यष्टीरक्षक फलंदाज लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर मोठ्या कालावधीनंतर भारतीय संघात परतत आहेत. तर विराट-रोहितची जोडी विश्वचषकानंतर प्रथमच एकत्र दिसेल.

चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, सदीराा समरविक्रमा, कामिंदू मेंडिस, जनिथ लियांगे, निशान मदुशंका, वानिंदू हसरंगा, डुनिथ वेल्लगे, चमिका करूणारत्ने, महीश थीक्क्षा, अकिला धनंजया, दिलशान मदुशंका, मथीक्क्षा पथिराना, असिथो फर्नांडो.

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, लोकेश राहुल, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.