Join us

Smriti Mandhana Harmanpreet Kaur, IND vs WI: स्मृती मानधना, हरमनप्रीतच्या शतकांमुळे भारत 'टेबल-टॉपर'; एकाच सामन्यात झाले अनेक विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 14:42 IST

Open in App
1 / 6

Smriti Mandhana Harmanpreet Kaur, IND vs WI: भारताच्या महिला संघाने ICC Women's World Cup मध्ये तगड्या वेस्ट इंडिजवर तब्बल १५५ धावांनी विजय मिळवला. भारताच्या महिला संघाने प्रथम फलंदाजी करत ८ बाद ३१७ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजला ४० षटकात १६२ धावाच करता आल्या. भारताने १५५ धावांनी हा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

2 / 6

स्मृती मानधनाच्या १२३ आणि हरमनप्रीत कौरच्या १०९ धावांच्या बळावर भारताने ५० षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यात ३१७ धावा कुटल्या. भारतीय संघाने पहिल्यांदा वन डे वर्ल्डकपमध्ये ३००चा टप्पा पार करण्याचा विक्रम केला.

3 / 6

स्मृती आणि हरमनप्रीत जोडीने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची चांगली धुलाई केली. या दोघींनी १८४ धावांची भागीदारी केली. वर्ल्ड कपच्या इतिहासात ही भारताकडून सर्वोत्तम भागीदारी ठरली.

4 / 6

भारताची कर्णधार मिताली राज हिच्या नावावरही एक विक्रम झाला. महिला वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सामन्यांमध्ये (२४) एखाद्या संघाचे कर्णधारपद भूषवण्याचा विक्रम तिने आपल्या नावे केला.

5 / 6

मितालीप्रमाणेच अनुभवी असलेल्या झूलन गोस्वामीनेही विक्रमाला गवसणी घातली. तिने महिला वन डे वर्ल्ड कपमध्ये आज ४० गडी बाद करण्याचा टप्पा गाठला. वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज होण्याचा मान तिने मिळवला.

6 / 6

दरम्यान, भारताने सामना जिंकल्यानंतर स्मृती मानधनाला सामनावीराचा किताब जाहीर केला. पण तिने तो सन्मान हरमनप्रीत कौरसोबत वाटून घेतला. तसेच, ICCने आम्हा दोघींना वेगवेगळ्या ट्रॉफी द्यायला हरकत नाही, असंही ती मजेत म्हणाली.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजस्मृती मानधनाझुलन गोस्वामीमिताली राज
Open in App