PHOTOS : अभिनेत्रींना टक्कर देणारी Team India ची 'नारी शक्ती'! पाहा सौंदर्य स्मृती-हरमनप्रीतचे

भारताच्या महिला क्रिकेट संघाचे शिलेदार अनंत-राधिका यांच्या लग्नाला पोहोचले.

शुक्रवारी मुंबईत दिग्गजांच्या उपस्थित प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांचा विवाहसोहळा पार पडला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट या जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी देश-विदेशातून पाहुणे हजर झाले होते.

बॉलिवूड कलाकार, उद्योगपती, क्रिकेटपटूंसह राजकीय क्षेत्रातील मंडळी मुंबईत पोहोचली. भारताच्या क्रिकेट संघाचे खेळाडूही यावेळी दिसले. पुरूष संघातील आजी माजी खेळाडूंनी हजेरी लावली.

भारताच्या महिला क्रिकेट संघाचे शिलेदारही अनंत-राधिका यांच्या लग्नाला पोहोचले. याची झलक समोर आली आहे.

भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मानधना, यास्तिका भाटिया आणि माजी खेळाडू झुलन गोस्वामी यांचे काही फोटो समोर आले आहेत.

अलीकडेच भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वन डे आणि ट्वेंटी-२० मालिका तसेच एक एकमेव कसोटी सामना खेळला.

आपल्या मायदेशात टीम इंडियाने ट्वेंटी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत संपवली. तर कसोटी आणि वन डे मालिकेत मोठा विजय साकारला.

यास्तिका भाटियाला कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीसोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. तर हरमन आणि स्मृती यांनी विविध पाहुण्यांसोबत फोटो काढला.

टीम इंडिया आगामी काळात श्रीलंकेत आशिया चषक खेळणार आहे. १९ जुलै रोजी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे.

श्रीलंकेत होणारा आशिया चषक चाहत्यांना मोफत पाहता येईल. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मोठी घोषणा करताना चाहत्यांना खुशखबर दिली.

आशिया चषकासाठी अलीकडेच बीसीसीयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. पुन्हा एकदा टीम इंडिया मोठ्या व्यासपीठावर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळेल.