हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोव्हिच यांच्या घरी पाळणा हलला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिकनं त्याला मुलगा झाल्याची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
या गोड बातमीनंतर सोशल मीडियावर हार्दिक-नताशा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. मुंबई इंडियन्सनंही या जोडीचं कौतुक केलं.
हार्दिकनं ही गोड बातमी देताना केवळ बाळाच्या इवल्याशा हाताचा फोटो पोस्ट केला होता. पण, आता त्याच्या बाळाचा फोटो व्हायरल झाला आहे आणि हार्दिकनं तो शेअर केला आहे.
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का देत आला आहे. 2020 वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यानं बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिचसोबत साखरपुडा करण्याचे जाहीर केले.
त्याच्या साखरपुड्याची कल्पना घरच्यांनाही नव्हती. शिवाय त्यानं गेल्या महिन्यात नताशा प्रेग्नंट असल्याचे जाहीर करून गुपचूप लग्नही उरकले.
हार्दिक आणि नताशा यांनी वर्षाच्या सुरुवातीला दुबईत मोजक्याच मित्रांच्या साक्षीनं साखरपुडा केला. हार्दिकनं ही बातमी सोशल मीडियावरून सर्वांना सांगितली.
हार्दिकच्या या सरप्राईजबद्दल त्याच्या कुटुंबीयांनाही माहित नव्हते. मुंबईत एका पार्टित या दोघांची भेट झाली आणि त्यानंतर दोघांमध्ये प्रेम झालं. नताशानं बॉलिवूडमधील काही चित्रपटांत काम केलं आहे.
हार्दिकनं शनिवारी बाळाचा फोटो पोस्ट केला. बाळाला त्यानं हातात घेतलेलं दिसत आहे.