वॉर्नरला काही दिवसांपूर्वी प्रश्न विचारले गेले आणि या प्रश्नांना त्याने सहजपणे उत्तरं दिली. यावेळी २०२३ साली झालेल्या विश्वचषकात तू खेळणार का, असा प्रश्न वॉर्नरला विचारण्यात आला. या प्रश्नावर वॉर्नरने भावनिक उत्तर दिले. या प्रश्नाला उत्तर देताना वॉर्नर म्हणाला की, ' मी आणि फिंच यांनी सध्या वयाची पस्तिशी ओलांडलेली आहे. मी ३६ वर्षांचा तर फिंच ३७ वर्षांचा आहे. मला तीन मुलेही आहेत. त्यामुळे याबाबत विचार करताना मी माझ्या पत्नीला पहिल्यांदा विचारेन. पण कुटुंबियांना वेळ देण्यासाठी मी लवकरच क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा मोठा निर्णय घेणार आहे.'