प्रेमातही 'दादा'नं दाखवलेली डेअरिंग; वैर असलेल्या कुटुंबातील मुलीसोबत सौरव गांगुलीनं थाटला संसार!

भारतीय क्रिकेटपटूंच्या लव्ह स्टोरी एखाद्या बॉलिवूड चित्रपटाच्या कथेप्रमाणे गाजलेल्या आहेत. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याची लव्ह स्टोरी तर अॅक्शन पॅक आहे. सौरव व त्याची पत्नी डोना ( Dona Ganguly) हे लहानपणापासून एकमेकांना ओळखायचे. दोघही शेजारी होते, पण त्यांच्या कुटुंबीयांमध्ये वैर होतं.

कुटुंबीयांचं वैर असूनही दोघंही एकमेकांच्या प्रेमात कधी पडले, हे त्यांनाच कळले नाही. डोनाला पाहण्यासाठी गांगुली कारणच शोधायचा. एवढंच काय, तर तो तिच्या शाळेतही लपूनछपून जायचा.

सौरव त्याच्या घराबाहेर बॅडमिंटन खेळायचा तेव्हा त्यानं मारलेला कॉक परत देण्याच्या बहाण्यानं डोना त्याला पाहायची. पण, एकमेकांच्या प्रेमात नक्की केव्हा, पडलो हे दोघांनाही नीटसं आठवत नाही.

कोलकाता येथील एका चायनीस रेस्ट्रॉरंटमध्ये सौरव व डोना पहिल्यांदा डेटवर गेले होते. तेव्हा सौरवनं भरपूर जेवण ऑर्डर केलं आणि ते संपवलही. सौरवचं हे खाणं पाहून डोना अवाक् झाली होती.

डोना रॉय यांच्या घरच्यांकडून सौरवसोबतचं नात्याला विरोध होता. विशेषतः डोनाच्या वडिलांचा. गांगुली-रॉय कुटुंबीयांमध्ये वर्षानुवर्षे वाद सुरू होता. तरीही ही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलीच. डोनाचा प्रत्येक डान्स पाहण्यासाठी सौरव हजर राहायचा, तर डोनाही सौरवची एकही मॅच चुकवायची नाही.

इंग्लंड दौऱा गाजवल्यानंतर सौरव मायदेशी परतला आणि त्यानं डोनासोबत रजिस्टर लग्न केलं. त्यांनी या लग्नाबाबत कोणालाच सांगितले नाही. पण, डोनाच्या घरच्यांना कुठूनतरी हे कळले आणि मोठा राडाच झाला. पण, त्यांचा हा राग हळुहळू शांत झाला आणि त्यांनी हे लग्न मान्य केलं.

1 फेब्रुवारी 1997 मध्ये दोघांनी कुटुंबीयांच्या साक्षीनं लग्न केलं. सौरव गांगुलीनं डोनाशी लग्न केलं. ती प्रसिद्ध नृत्यांगना आहे. सौरव आणि डोना एकमेकांचे शेजारी होते.

सौरव गांगुली भारताचा सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. विदेशात जाऊन ऐटीत विजय कसा मिळवायचा हे त्यानं टीम इंडियाला शिकवलं. त्यानं 113 कसोटी, 311 वन डे सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आणि अनुक्रमे 7212 व 11363 धावा केल्या.