Join us

सौरव गांगुलीने दुबईत चालवली रेसिंग कार, ट्रोलिंग सुरू झाल्यावर उचललं असं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 16:32 IST

Open in App
1 / 5

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली सध्या यूएईच्या दौऱ्यावर आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या टप्प्याच्या आयोजनाबाबत सौरव गांगुली सध्या संयुक्त अरब अमिराती क्रिकेट मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहे. या भरगच्च कार्यक्रमांदरम्यान वेळात वेळ काढून सौरव गांगुलीने दुबईत रेसिंग कार चालवली.

2 / 5

सौरव गांगुलीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या कार ड्रायव्हिंगचे फोटे शेअर केले. त्यामध्ये गांगुली कार रेसिंगच्या ड्रेसमध्ये दिसत आहेत. गांगुलीने फोटो शेअर करून त्याखाली एक कॅप्शन दिली आहे. त्यात तो म्हणाला की, आज कार रेसिंग केले. हा खेळ एक अविश्वसनीय ऊर्जा देऊ शकतो. मात्र चाहत्यांनी दादाच्या या फोटोचे कौतुक करण्याऐवजी ट्रोलिंग सुरू केलं.

3 / 5

काही युझर म्हणाले की, तुम्ही तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घेतली पाहिजे. तसेच अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केले पाहिजे. काही महिन्यांपूर्वीच हृदयविकाराच्या धक्क्यामुळे दादावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर अनेक दिवस दादा रुग्णालयात उपचार घेत होता. दरम्यान, ट्रोल झाल्यानंतर दादाने हा फोटो डिलिट केला.

4 / 5

यापूर्वी गांगुलीने गुरुवारी एक फोटो शेअर केला होता. त्यामध्ये तो दुबईच्या कुठल्यातरी हॉटेलमध्ये बसलेला दिसला होता. गांगुलूने या फोटोसोबत एक कॅप्शन दिली होती. दुबईने मला लॉकडाऊनमधून मुक्त केले, असे तो म्हणाला होता.

5 / 5

गांगुली आयपीएल १४ च्या दुसऱ्या टप्प्याच्या नियोजनासाठी सध्या दुबईमध्ये आहे. कोरोनामुळे आयपीएलचा १४ हंगाम ४ मे रोजी अर्ध्यांवरूनच स्थगित करण्यात आला होता. आता या हंगामातील उर्वरित सामने हे संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवले जातील. हे सामने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार आहेत.

टॅग्स :सौरभ गांगुलीबीसीसीआयसंयुक्त अरब अमिराती