Cricket Buzz»फोटो गॅलरी »शिष्य असावा तर असा; व्हेंटिलेटरवर असलेल्या 'गुरू'साठी सौरव गांगुली धावला!शिष्य असावा तर असा; व्हेंटिलेटरवर असलेल्या 'गुरू'साठी सौरव गांगुली धावला! By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 4:44 PMOpen in App1 / 10भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा ( बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली याच्यातला देव माणूस या कठीण काळात सर्वांना दिसला.2 / 10कोरोना व्हायरसशी संघर्ष करण्यासाठी गांगुलीनं पश्चिम बंगाल सरकारच्या मदतीसाठी ईडन गार्डन खुलं केलं.3 / 10लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्यांसाठी गांगुलीनं 50 लाख किमतीचे तांदुळ सरकारला दान केले.4 / 10कोलकाता येथील इस्कॉनच्या मदतीसाठीही गांगुलीनं पुढाकार घेतला. त्यानं दररोज 10000 लोकांच्या जेवणासाठी मदत केली.5 / 10बुधवारी गांगुलीचा आणखी एक पैलू जगासमोर आला. टीम इंडियाच्या या माजी कर्णधारानं आणखी एक लाखमोलाचं काम केलं आहे. 6 / 10ज्यांचा हात पाकडून क्रिकेटचे धडे गिरवले त्या गुरूसाठी गांगुली धावला आहे. गांगुलीचे पहिले प्रशिक्षक अशोक मुस्तफी हे सध्या मृत्यूशी लढा देत आहेत.7 / 10अशोक मुस्तफी यांना बंगालचे रमाकांत आचरेकर म्हणून ओळखले जातात. गांगुलीनं गुरूच्या सर्व वैद्यकीय खर्चाचा भार आपल्या खांद्यावर घेतला आहे.8 / 10मित्र संजय दास याच्याकडून गांगुलीला अशोक मुस्तफी यांच्या प्रकृतीची माहिती मिळाली. 9 / 10अशोक मुस्तफी सध्या व्हेंटीलेटरवर आहेत. अशोक येथे एकटेच राहतात आणि त्यांची मुलगी इंग्लंडमध्ये स्थायिक आहे.10 / 10गांगुलीला गुरू अशोक यांच्याबद्दल जेव्हा माहीत पडले, तेव्हा त्यानं त्वरीत हॉस्पिटलमध्ये फोन करून सर्व खर्च करणार असल्याचे सांगितले. आणखी वाचा Subscribe to Notifications