Join us  

धक्कादायक: दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू Corona Positive; यकृत अन् मूत्रपिंड झाले निकामी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2020 10:16 AM

Open in App
1 / 10

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या शुक्रवारी 39 लाख, 17,585 इतकी झाली असून 13 लाख, 44,136 रुग्ण बरे झाले आहेत. पण, 2 लाख 70,720 जणांना प्राण गमवावे लागले आहेत.

2 / 10

कोरोना व्हायरसचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. जगभरातील फुटबॉलपटूंना कोरोना व्हायरसची लागण झाली असून काही खेळाडूंचे कोरोनामुळे निधनही झाले आहेत.

3 / 10

क्रिकेट विश्वाची चिंता वाढवणारी बातमी शुक्रवारी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेचा 25 वर्षीय अष्टपैलू खेळाडूलाही कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.

4 / 10

दुःखाची बाब म्हणजे या खेळाडूचे यकृत आणि मूत्रपिंडही निकामी झाले आहेत. तो 10 महिन्यांपासून आजाराशी संघर्ष करत आहे. हे सर्व दुःख असताना त्यात त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

5 / 10

दक्षिण आफ्रिकेचा प्रथम श्रेणी क्रिकेटपटू सोलो नक्वेनीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानं स्वतः ट्विटरवरून ही बातमी दिली आहे.

6 / 10

नक्वेनी गतवर्षी जुलै महिन्यापासून प्रतिरोधक क्षमता आणि तंत्रिका तंत्राशी संबंधीत आजाराशी संघर्ष करत आहे. स्कॉटलंडमध्ये तो उपचार घेत आहे.

7 / 10

पाकिस्तानचा जाफर सर्फराज आणि स्कॉटलंडच्या माजिद हक यांच्यानंतर कोरोनाची लागण झालेला नक्वेनी तिसरा क्रिकेटपटू आहे.

8 / 10

नक्वेनी म्हणाला की,''गेल्या वर्षभरापासून मी गुलियन या रोगाशी संघर्ष करत आहे आणि त्यातून बरा होत असताना मला TB झाला. माझे यकृत आणि मूत्रपिंड निकामी झाले आहेत आणि आता मला कोरोना झाला आहे. हे माझ्यासोबतच का घडतंय, हेच समजत नाही.''

9 / 10

नक्वेनी हा 2012मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या 19 वर्षांखालील संघाकडून खेळला होता. त्याच्या उपचारासाठी आफ्रिका संघान 50 हजार रैंडची मदत केली आहे.

10 / 10

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याद. आफ्रिका