वर्ल्ड कप गाजवणारा गोलंदाज अडकला विवाहबंधनात; त्याला म्हटलं जातंय भविष्याचा सुपरस्टार

वन डे वर्ल्ड कप २०२३ मध्ये अनेक खेळाडूंच्या कारकीर्दिला नवी उभारी मिळाली आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी (Gerald Coetzee ) हा त्यापैकी एक... ज्याने अवघ्या ८ महिन्यांत आपल्या कारकिर्दीची दिशाच बदलून टाकली. गेराल्डने वर्ल्ड कप स्पर्धेत अप्रतिम गोलंदाजी केली आणि आता तो लग्नबंधनात अडकला आहे.

गेराल्डने त्याच्या लग्नाचे फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत आणि देवाचे आभारही मानले आहेत. २०२३च्या वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा संघ आक्रमक कामगिरी करताना दिसला.

एकीकडे फलंदाज आक्रमण करत होते, तर दुसरीकडे संघाचे गोलंदाज त्यांच्या वेगाने प्रतिस्पर्धी संघाची परीक्षा घेत होते. उत्कृष्ट कामगिरीमुळे संघाला उपांत्य फेरीचे तिकीट मिळाले.

मात्र बाद फेरीच्या सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलियाकडून हार मानावी लागली. संघाला उपांत्य फेरीत नेण्यात गेराल्डनेही खारीचा वाटा उचलला. त्याने ८ सामन्यांत २० विकेट्स घेतल्या.

वर्ल्ड कपच्या या पर्वात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अव्वल पाच खेळाडूंमध्ये तो होता. गेराल्डने आपल्या लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. पत्नीसोबतचा फोटो शेअर करताना त्याने कथेवर लिहिले, 'Incredibly, Thank God.'

गेराल्डने ८ महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय संघात पदार्पण केले होते. त्याने वर्ल्ड कपमधील सर्व सामन्यांसह एकूण 14 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ३१ विकेट्स आपल्या नावावर केल्या. या

चमकदार कामगिरी केल्यानंतर आणि आयुष्यातील नवीन इनिंग सुरू केल्यानंतर, गेराल्ड आयपीएलमध्येही आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाला आहे.

आयपीएल २०२४ साठी मिनी लिलाव १९ डिसेंबर रोजी होणार आहे आणि त्यात गेराल्ड २ कोटी रुपयांच्या मूळ किंमतीसह लिलावात सहभागी होण्यास तयार आहे.

ज्याने अवघ्या ८ महिन्यांत आपल्या कारकिर्दीची दिशाच बदलून टाकली. गेराल्डने वर्ल्ड कप स्पर्धेत अप्रतिम गोलंदाजी केली आणि आता तो लग्नबंधनात अडकला आहे.