Cricket Buzz»फोटो गॅलरी »काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली? By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 7:59 PM1 / 7सध्या भारताची दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी२० मालिका सुरु आहे. या मालिकेनंतर आगामी IPL स्पर्धेसाठी खेळाडूंचा मेगालिलाव केला जाणार आहे. प्रत्येक संघाने आपापले रिटेन केलेले म्हणजेच संघात कायम ठेवलेले खेळाडू जाहीर केले आहेत.2 / 7हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारन हिने आफ्रिकेचा हेनरिक क्लासेन, ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड आणि पॅट कमिन्स यांच्यासह भारताचा अभिषेक शर्मा आणि नितीश रेड्डी या पाच खेळाडूंना रिटेन केले आहे.3 / 7काव्याच्या SRH संघाने करारमुक्त केलेल्या एका फलंदाजाने नुकताच मोठा धमाका केला आहे. इतकंच नव्हे, तर एका दिग्गज क्रिकेटपटूच्या अंदाजानुसार, त्या खेळाडूला लिलावात तब्बल १० कोटींची बोली लागू शकेल.4 / 7दक्षिण आफ्रिकाविरुद्धची तिसरी T20 भारतीय संघाने ( IND vs SA 3rd T20 ) अत्यंत रोमहर्षकपणे जिंकली. तिलक वर्माने ठोकलेल्या दमदार शतकामुळे भारताने द्विशतकी मजल मारली. त्याला आफ्रिकेच्या मार्को यान्सेनने तगडे आव्हान दिले.5 / 7या आव्हानाचे पाठलाग करताना अठराव्या षटकापर्यंत सामना भारताच्या मुठीत होता. शेवटच्या दोन षटकात ५१ धावांची गरज असताना आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू मार्को यान्सेन याने भारतीय गोलंदाजांची पळता भुई थोडी केली.6 / 7मार्कोचे प्रयत्न थोडेसे तोकडे पडले पण त्याने १७ चेंडूत ५४ धावांची धुवाँधार बॅटिंग केली. मार्को गेल्या हंगामात SRH मध्ये होता, पण त्याला आता करारमुक्त करण्यात आले. आता काव्याने सोडलेल्या खेळाडूच्या खेळीमुळे त्याच्यावर मोठी बोली लागू शकते.7 / 7मार्को यान्सेनने शेवटच्या टप्प्यात भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. त्याने १७ चेंडूत ५ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ५४ धावा कुटल्या. त्याच्या खेळीचे कौतुक करताना दिग्गज गोलंदाज डेल स्टेनने त्याच्यावर यंदा १० कोटींची बोली लागण्याची शक्यता वर्तवली. आणखी वाचा Subscribe to Notifications