Join us  

Kaviya Maran ला लॉटरी लागली; IPL आधीच १०.७५ कोटी मोजलेल्या खेळाडूने भारताविरुद्ध विक्रमांची आतषबाजी केली!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 1:05 PM

Open in App
1 / 7

ट्वेंटी-२० मालिकेत विंडीजकडून संघर्ष पाहायला मिळाला, परंतु एक-दोन खेळाडू वगळल्यास सातत्य कुणालाच दाखवता आले नाही. त्या एक दोन खेळाडूमध्ये एक नाव असे होते की जे पाहून सनरायझर्स हैदराबादची ( Sunrisers Hyderabad) मालकिण काविया मारन ( Kaviya Maran) मात्र खूश झाली आहे.

2 / 7

भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत विंडीजचा निकोलस पूरन ( Nicholas Pooran) याने अर्धशतकांची हॅटट्रिक साजरी केली. आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये SRH ने त्याला १०.७५ कोटींत आपल्या ताफ्यात करून घेतले.

3 / 7

त्याने तीन ट्वेंटी-२० सामन्यांत अनुक्रमे ६१, ६२ व ६१ अशी खेळी केली. तिसऱ्या सामन्यात त्याने ४७ चेंडूंत ८ चौकार व एक षटकारासह १२९ च्या स्ट्राईक रेटने ६१ धावांची खेळी केली.

4 / 7

आयपीएल २०२१मध्ये पंजाब किंग्सकडून खेळताना पूरनला ११ सामन्यांत ८५ धावा करता आल्या होत्या. त्यामुळे त्याला पंजाब किंग्सने रिलीज केले. त्यानंतर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतही पूरनने २०.६०च्या सरासरीने केवळ १०३ धावा केल्या.

5 / 7

पण, भारताविरुद्धच्या मालिकेत त्याची बॅट चांगलीच तळपली. वन डे मालिकेत त्याने २०.३३च्या सरासरीने ६१ धावा केल्या असल्या तरी ट्वेंटी-२०त त्याने क्लास दाखवला.

6 / 7

भारताविरुद्ध ट्वेंटी-२० मालिकेत सर्वाधिक धावांचा विक्रम पूरनने ( १८४) स्वतःच्या नावावर केला आहे. त्याने न्यूझीलंडचा कॉलिन मुन्रो ( १७८ धावा, २०२०) आणि इंग्लंडचा जोस बटलर ( १७२ धावा, २०२१) यांचा विक्रम मोडला. विशेष म्हणजे मुन्रो व बटलर यांनी पाच सामन्यांच्या मालिकेत या धावा केल्या.

7 / 7

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजसनरायझर्स हैदराबादवेस्ट इंडिज
Open in App