Join us  

इंडियन प्रीमिअर लीगच्या फॅन्ससाठी Good News!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 2:46 PM

Open in App
1 / 12

कोरोना व्हायरसच्या संकटात इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 13 व्या मोसमावर अनिश्चिततेचं सावट अजूनही कायम आहे. 29 मार्चपासून सुरू होणारी आयपीएल स्पर्धा तीन वेळा स्थगित करण्यात आली.

2 / 12

देशातील लॉकडाऊन वाढला असल्यानं ही स्पर्धा खेळवली जाईल की नाही याबाबत अजूनही संभ्रमाचं वातावरण आहे. आयपीएल न झाल्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) 4000 कोटींचा फटका बसणार आहे.

3 / 12

बीसीसीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार आयपीएल स्पर्धा 25 सप्टेंबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत घेण्याचा विचार सूरू आहे.

4 / 12

या कालावधीत ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे आणि ती रद्द झाल्यास त्या कालावधीत आयपीएल खेळवली जाऊ शकते, असा विचार सध्या सुरू आहे.

5 / 12

आयपीएल होत नसल्यानं चाहत्यांची मात्र हिरमोड होत आहे. पण, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आयपीएल चाहत्यांसाठी स्टार स्पोर्ट्स वाहिनीतर्फे ही गोड बातमी देण्यात आली आहे.

6 / 12

24 मे पासून स्टार स्पोर्ट्स वाहिनी आयपीएलच्या 12व्या मोसमाचे 12 अंतिम सामन्यांचं पुनःप्रक्षेपण करणार आहेत.

7 / 12

24 मे ला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील 2019च्या आयपीएलचा अंतिम सामना सकाळी 11 वाजता दाखवला जाणार आहे. त्यानं 2018चा अंतिम सामना दुपारी 3 वाजता दाखवला जाईल. चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात हा सामना खेळवला गेला होता.

8 / 12

25 मे - मुंबई इंडियन्स वि. रायजिंग पुणे सुपरजायंट्स ( 2017) - सकाळी 11 वाजता; सनरायझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( 2016) - दुपारी 3 वाजता.

9 / 12

26 मे - मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स ( 2015)- सकाळी 11 वाजता; कोलकाता नाईट रायडर्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब ( 2014) - दुपारी 3 वाजता

10 / 12

28 मे - चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( 2011) - सकाळी 11 वाजता; चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स ( 2010) दुपारी 3 वाजता

11 / 12

27 मे - मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स ( 2013) - सकाळी 11 वाजता; कोलकाता नाईट रायडर्स वि. चेन्नई सुपर किंग्स - दुपारी 3 वाजता

12 / 12

29 मे - दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( 2009) - सकाळी 11 वाजता; राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स ( 2008) - दुपारी 3 वाजता;

टॅग्स :आयपीएल 2020आयपीएल