Join us

१७८-१७८! धरमशाला जिंकून भारताने साधले अजब गणित, अश्विननेही मोडला मोठा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 17:36 IST

Open in App
1 / 7

आर अश्विनने पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेतल्या आणि त्याने ३६ वेळा हा पराक्रम करून अनिल कुंबळेचा ( ३५) विक्रम मोडला. सर्वाधिकवेळा डावात ५ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये आर अश्विन हा रिचर्ड हॅडली ( ३६) यांच्यासह संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. मुथय्या मुरलीधरन ( ६७) व शेन वॉर्न ( ३७) हे आघाडीवर आहेत.

2 / 7

१००वी कसोटी खेळणाऱ्या आर अश्विनने डोन्ही डावांत मिळून ९-१२८ अशी गोलंदाजी केली. १००व्या कसोटीत कोणत्याही गोलंदाजांकडून झालेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. २००६ मध्ये मुथय्या मुरलीधरन याने त्याच्या १००व्या कसोटीत बांगलादेशविरुद्ध ९-१४१ अशी कामगिरी केली होती. १००व्या कसोटीत दोन्ही डावांत ४ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेणारा अश्विन हा पहिलाच गोलंदाज ठरला.

3 / 7

जेम्स अँडरसनने या कसोटीत कुलदीप यादवची विकेट घेऊन ७०० विकेट्सचा टप्पा गाठला. कसोटीत असा पराक्रम करणारा तो पहिला जलदगती गोलंदाज ठरला. मुथय्या मुरलीधरन ( ८००) व शेन वॉर्न ( ७०८) हे फिरकीपटू हा पराक्रम करू शकले आहेत.

4 / 7

इंग्लंडविरुद्ध कसोटीत आर अश्विनने १०० हून अधिक विकेट घेतल्या आहेत. घरच्या मैदानावर एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध कसोटीत असा पराक्रम करणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. स्टुअर्ट ब्रॉडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरी १०६ आणि जेम्स अँडरसनने भारताविरुद्ध घरी १०५ विकेट्स घेतल्या आहेत.

5 / 7

घरच्या मैदानावर कसोटीत अश्विनने इंग्लंडविरुद्ध ८ वेळा डावात ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम करताना मुथय्या मुरलीधरन याच्या ( बांगलादेश व दक्षिण आफ्रिका) विक्रमाशी बरोबरी केली आहे.

6 / 7

घरच्या मैदानावरील टीम इंडियाचा हा ११८ वा कसोटी विजय ठरला, जी घरच्या मैदानावरील कोणत्याही संघाची तिसरी सर्वाधिक कामगिरी आहे. त्यांनी दक्षिण आफ्रिकेला ( ११७) मागे टाकले, पंरतु ऑस्ट्रेलिया ( २५९) व इंग्लंड ( २३३) हे अजूनही भारताच्या पुढे आहेत.

7 / 7

धरमशाला कसोटी जिंकून टीम इंडियाने जय-पराजयाची आकडेवारी ही १७८-१७८ अशी समसमान आणली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताच्या इतिहासात असे प्रथमच घडले आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडआर अश्विनभारतीय क्रिकेट संघ