Stats - ग्लेन मॅक्सवेलची तुफान फटकेबाजी! रोहितच्या विक्रमाशी बरोबरी, तर सूर्यावर फडला भारी

AUS vs WI 2nd T20I - ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात वेस्ट इंडिजवर ३४ धावांनी विजयी मिळवून मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. ग्लेन मॅक्सवेलच्या विक्रमी शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ४ बाद २४१ धावा केल्या आणि विंडीजनेही ९ बाद २०७ धावांपर्यंत जोर लावला होता.

एडिलेडवर झालेल्या या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने ५५ चेंडूंत १२ चौकार व ८ षटकारांच्या मदतीने नाबाद १२० धावांची विक्रमी खेळी केली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील हे त्याचे पाचवे शतक ठरले आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त रोहित शर्माच्या सर्वाधिक पाच शतकांच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली.

ऑस्ट्रेलियाने या सामन्यात ४ बाद २४१ धावा केल्या आणि या ऑस्ट्रेलियातील आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्याताली कोणत्याही संघाकडून झालेला सर्वोच्च धावसंख्या ठऱल्या. यापूर्वी २०१९मध्ये ऑस्ट्रेलियाने एडिलेड येथेच श्रीलंकेविरुद्ध २ बाद २३३ धावा केल्या होत्या.

ग्लेन मॅक्सवेलने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त झळकावलेली पाचपैकी ४ शतकं ही चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना आली आहेत. चौथ्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर सर्वाधिक शतकांचा विक्रम मॅक्सवेलने मोडले. यापूर्वी सूर्यकुमार यादवने ३ शतकं झळकावली होती. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावरील हे त्याचे पाचवे शतक ठरले आणि त्याने डेव्हिड मिरलचा ( ४) विक्रम मोडला.

ग्लेन मॅक्सवेलची नाबाद १२० धावांची खेळी ही एडिलेड ओव्हलवरील चौथ्या क्रमांवारील कोणत्याही खेळाडूकडून झालेली सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. शिवाय आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त चौथ्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावरील झालेली ही दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. बेल्जियमच्या शहरयार बटने २०२० मध्ये सहाव्या क्रमांकावर येताना झेक प्रजासत्ताकविरुद्ध नाबाद १२५ धावा केल्या होत्या.

वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील ग्लेन मॅक्सवेलची खेळी ही सर्वोत्तम ठरली. यापूर्वी २०१९ मध्ये फॅफ ड्यू प्लेसिस ( जोहान्सबर्ग) व फिल सॉल्ट ( २०२३) यांनी ११९ धावा चोपल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून ट्वेंटी-२०तील ही दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. २०१६ मध्ये शेन वॉटसनने भारताविरुद्ध १२४ धावा केल्या होत्या.