Cricket Buzz»फोटो गॅलरी »ENG vs PAK : पाकिस्तानची ट्वेंटी-२०त रिकॉर्डतोड खेळी, इंग्लंडची जिरवत टीम इंडियाला दिला इशारा!ENG vs PAK : पाकिस्तानची ट्वेंटी-२०त रिकॉर्डतोड खेळी, इंग्लंडची जिरवत टीम इंडियाला दिला इशारा! By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 2:47 PMOpen in App1 / 10आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी एकाच गटात आल्यानं चाहते हाय व्होल्टेज सामन्यासाठी आतापासूनच तयारीला लागले आहेत. शुक्रवारी दुपारी आयसीसीनं ही गटवारी जाहीर केली अन् रात्री झालेल्या ट्वेंटी-२० सामन्यात पाकिस्तानच्या संघानं रिकॉर्डतोड कामगिरी करून इंग्लंडची जिरवत टीम इंडियाला धोक्याचा इशारा दिला. 2 / 10पाकिस्तान संघानं प्रथम फलंदाजी करताना विक्रमी ६ बाद २३२ धावांचा डोंगर उभारला. मोहम्मद रिझवान ( ६३) आणि कर्णधार बाबर आजम ( ८५) यांनी अर्धशतकी खेळी केली. फखर जमान ( २६) व मोहम्मद हाफिज ( २४) यांनी संघाच्या धावसंख्येत भर घातली. विराट कोहलीचा प्रतिस्पर्धी असलेल्या बाबरनं ४९ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह दमदार खेळ केला.3 / 10इंग्लंडकडून लाएम लिव्हिंगस्टोननं ४३ चेंडूंत ६ चौकार व ९ षटकारांसह १०३ धावा कुटल्या, परंतु ३१ धावांनी त्यांना हार मानावी लागली. जेसन रॉयनं ३२ धावा केल्या. इंग्लंडचा संपूर्ण संघ १९.२ षटकांत २०१ धावांत तंबूत परतला. शाहिन शाह आफ्रिदी व शाबाद खान यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.4 / 10६ बाद २३२ धावा या पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम धावा आहे. यापूर्वी त्यांनी २०१८मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ३ बाद २०५ धावा केल्या होत्या. इंग्लंडविरुद्ध ट्वेंटी-२० क्रिकेटमधील ही प्रतिस्पर्धी संघाची तिसरी सर्वोत्तम धावसंख्या आहे.5 / 10पाकिस्तानी संघानं या सामन्यात १२ षटकार खेचले आणि ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये त्यांच्याच सर्वाधिक षटकार खेचण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्यांनी २००७मध्ये बांगलादेशविरुद्ध १२ षटकार खेचले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी हे १२ षटकार ११ षटकानंतर खेचले. टीम इंडियानं श्रीलंकेविरुद्ध २०१७मध्ये १४ षटकार खेचले होते. 6 / 10बाबर आजम आणि मोहम्मद रिझवान यांनी १५० धावांची भागीदारी करताना पाकिस्तानकडून दुसरी सर्वोत्तम भागीदारीची नोंद केली. या दोघांनीच एप्रिल महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १९७ धावांची भागीदारी केली होती.7 / 10याआधी शिखर धवन आणि रोहित शर्मा ही एकमेव जोडी अशी होती की ज्यांनी ट्वेंटी-२०त दोनवेळा १५०+ भागीदारी केली आहे. बाबर-मोहम्मद यांनी त्यांच्याशी बरोबरी केली. या जोडीनं १२ डावांत तीन वेळा शतकी भागीदारी केली. धवन व रोहित आणि मार्टिन गुप्तील व केन विलियम्सन यांच्या नावावर ४ शतकी भागीदारी आहेत.8 / 10पाकिस्ताननं अखेरच्या १० षटकांत १५२ धावा कुटल्या. सहावेळा ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये संघानं अखेरच्या दहा षटकांत १५०+ धावा केल्या. 9 / 1010 / 10 आणखी वाचा Subscribe to Notifications