क्रिकेट जगतामध्ये क्रिकेटपटू विवाहित महिलांच्या प्रेमात पडण्याच्या घटना काही नव्या नाहीत. धर्म, देश यांच्या मर्यादा ओलांडूनही काही क्रिकेटपटूंनी विवाह केले आहेत. मात्र काही क्रिकेटपटूंनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या संसारात मिठाचा खडा टाकून त्यांच्या पत्नीसोबत संसार थाटल्याच्या घटनाही घडलेल्या आहे. भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक आणि मुरली विजय यांचं याबाबत उदाहरण दिलं जातं. दरम्यान, असाच प्रकार आणखी एका दिग्गज क्रिकेटपटूसोबत लग्न केलं आहे.
दिनेश कार्तिक आणि मुरली विजय यांच्यातील कटू संबंध जगजाहीर आहेत. कारण मुरली विजयने दिनेश कार्तिकच्या पत्नीवर वाईट नजर टाकत त्यांच्या नात्यामध्ये फूट पाडली. मग त्यांच्यात घटस्फोट झाल्यावर दिनेश कार्तिकच्या पत्नीसोबत लग्नही केलं.
मात्र ही काही अशा प्रकारची पहिली घटना नाही आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक प्रकार घडले आहेत. दरम्यान, श्रीलंकेमध्येही अशी घटना घडली होती. २०१४ मध्ये श्रीलंकेला टी-२० वर्ल्डकप जिंकून देणारा तिलकरत्ने दिलशान आणि सलामीवीर उपुल थरंगा यांच्यात दिनेश कार्तिक आणि मुरली विजयसारखा प्रकार घडला होता.
तिलकरत्ने दिलशानच्या पहिल्या पत्नीचं नाव निलांका आहे. दोघांनाही एक मुलगा आहे. त्याचं नाव रिसादू तिलकरत्ने आहे. दोघांचही वैवाहिक जीवन चांगलं जात होतं. मात्र त्यामध्ये अचानक उपूल थरंगाने एंट्री घेतली. तिलकरत्ने दिलशान श्रीलंकेच्या संघासोबत दौऱ्यावर असताना निलांकाची ओळख उपूल थरंगासोबत झाली.
थरंगा आणि निलांका यांच्यात मैत्री झाली. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांच्यातील नातं जगजाहीर झालं. आपली पत्नी फसवत असल्याचं समजल्यावर दिलशानने तिला घटस्फोट दिला. त्यानंतर निलांका आणि उपूल थरंगा यांनी लग्न केले.
नंतर दिलशाननेही जीवनात पुढे जात अभिनेत्री मंजुला हिच्याशी विवाह केला. दुसऱ्या विवाहातून दिलशानला दोन मुलगे आणि दोन मुली झाल्या. त्यांचं वैवाहिक जीवन सुखात जात आहेत मात्र त्याचा पहिल्या पत्नीसोबतचा मुलाबाबतचा वाद कोर्टात बराच काळ चालला.
निलंकाने मुलाच्या पोटगीसाठी दिलशानविरोधात कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर कोर्टाच्या आदेशाने दिलशानकडून पोटगी म्हणून भरपूर रक्कम मिळू लागली. मात्र २०१७ मध्ये दिलशानने अचानक पोटगी बंद केली होती. तेव्हा निलांकाने पुन्हा कोर्टात धाव घेतली. त्यानंतर कोर्टाच्या आदेशाने पुन्हा एकदा दिलशानने ही रक्कम देण्यास सुरुवात केली.