Join us

Sunil Gavaskar Kuldeep Yadav, IND vs BAN 2nd Test: "मी यापेक्षाही वाईट शब्द वापरू शकतो पण..."; सुनील गावसकर KL Rahul वर प्रचंड संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 16:22 IST

Open in App
1 / 6

Sunil Gavaskar Kuldeep Yadav, IND vs BAN 2nd Test: ढाका येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये असा बदल केला की साऱ्यांनाच धक्का बसला. केएल राहुलने (KL Rahul) गेल्या सामन्यातील नायक ठरलेल्या कुलदीप यादवलाच बेंचवर बसवले.

2 / 6

सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कुलदीपला मागच्या सामन्यात त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार मिळाला आणि त्याला दुखापतही झाली नव्हती.

3 / 6

टीम इंडियाच्या या निर्णयामुळे माजी कर्णधार सुनील गावस्कर देखील आश्चर्यचकित झाले. त्यांनी आश्‍चर्य तर व्यक्त केलंच पण त्यासोबतच त्यांनी आपली संतप्त प्रतिक्रियाही दिली.

4 / 6

सुनील गावसकर हे कायमच आपल्या रोखठोक विधानांसाठी ओळखले जातात. त्यांनी याबाबतीतही स्पष्ट मत मांडले. मागील सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूला कसे वगळले जाऊ शकते, असा सवाल त्यांनी केला.

5 / 6

गावसकर म्हणाले, 'मागच्या सामन्यातील सामनावीराला म्हणजेच सर्वोत्तम खेळाडूला संघातून बाहेर काढणे खरोखरच अविश्वसनीय आहे. मी हा जो शब्द वापरलाय तो खूपच साधा आणि सभ्य अशा पद्धतीचा आहे. मी यापेक्षाही वाईट शब्द वापरू शकतो. मला कठोर शब्द वापरायचा आहे पण सध्या असू दे.'

6 / 6

'मागील सामन्यात २० पैकी ८ बळी टिपणारा खेळाडू तुम्ही संघातून बाहेरच बसवलात. त्यातही संघात आणखी दोन फिरकीपटू आहेत, त्यांच्यापैकी एकाला बाहेर बसवणं ठीक आहे पण तुम्ही त्यालाच बाहेर बसवलंत ज्याने खेळपट्टीचा अंदाज घेत तुम्हाला सामना जिंकवून दिला. काहीही झाले तरी कुलदीपला खेळवायला हवं होतं,' असे रोखठोक मत त्यांनी मांडलं.

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशसुनील गावसकरलोकेश राहुलकुलदीप यादव
Open in App