Cricket Buzz » फोटो गॅलरी » Sunil Gavaskar Angry, Mumbai Indians IPL 2022: "त्याला बॅटिंग करण्यात अजिबात रस दिसत नव्हता"; मुंबई इंडियन्सच्या स्टार फलंदाजावर सुनील गावसकर संतापले... Sunil Gavaskar Angry, Mumbai Indians IPL 2022: "त्याला बॅटिंग करण्यात अजिबात रस दिसत नव्हता"; मुंबई इंडियन्सच्या स्टार फलंदाजावर सुनील गावसकर संतापले... Open in App Sunil Gavaskar Angry, Mumbai Indians IPL 2022: मुंबई इंडियन्सच्या संघाला यंदाच्या हंगामात सलग आठ पराभवांमुळे स्पर्धेतून पॅक-अप करावे लागले. मुंबईच्या संघाने रविवारी लखनौसोबतचा सामना गमावला.
या सामन्यात मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू इशान किशनच्या (Ishan Kishan) फलंदाजीवर आणि त्याच्या बाद होण्याच्या पद्धतीवर माजी कर्णधार आणि क्रिकेट जाणकार सुनील गावसकर यांनी अत्यंत तीव्र शब्दात टीका केली.
'मला असं वाटतं की जो चेंडू त्याच्या हेल्मेटवर लागला होता, त्या चेंडूमधून मानसिकरित्या बाहेर यायला इशान किशनला वेळ लागला. आधीही त्याच्या हेल्मेटला बाऊन्सर चेंडू लागला आहे. त्यामुळे असं सातत्याने होणं हे चांगले संकेत नाहीत. अशा फलंदाजाला तुम्ही ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेच्या पिचवर घेऊन जाणार का?'
'ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या पिचवर चेंडू नेहमीपेक्षा जास्त उसळी घेतो. अशा दौऱ्यांवर त्याला प्रचंड समस्यांचा सामना करावा लागू शकतो. प्रत्येक फलंदाज त्याला शॉर्टपिच गोलंदाजी करेल. कोणताही चेंडू कमरेच्या खाली नसेल. अशा परिस्थितीत खेळणं त्याच्यासाठी नक्कीच अवघड होऊन बसेल', असा अंदाज गावसकर यांनी व्यक्त केला.
'स्वाभाविकपणे, जेव्हा चेंडू बॅटला लागून स्लिपमध्ये जातो आणि जमिनीच्या जवळ असताना झेल घेतला जातो, त्यावेळी फलंदाज नाबाद असल्याची आशा ठेवत क्रीजमध्येच थांबतो आणि पंचांच्या निर्णयाची वाट पाहतो. पण इशान किशन सरळ मैदानातून बाहेरच चालायला लागला.'
'बाद होताच तो स्वत:च मैदानात निघून जायला लागला होता. त्याला काहीही करून लवकरात लवकर बॅटिंग संपवून मैदानाबाहेर जायचं होतं, असं त्याच्याकडे बघून वाटलं. किशनला फलंदाजी करण्यात अजिबात रस नव्हता. या वर्तणुकीवरूनच खेळाडूची मानसिकता दिसून येते', असे गावसकर म्हणाले.
आणखी वाचा