Cricket Buzz»फोटो गॅलरी »Sunil Gavaskar, IPL 2022 KKR vs RR: "हे अजिबात बरोबर नाही..."; सुनील गावसकर राजस्थानच्या संघावर संतापलेSunil Gavaskar, IPL 2022 KKR vs RR: "हे अजिबात बरोबर नाही..."; सुनील गावसकर राजस्थानच्या संघावर संतापले By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2022 2:29 PMOpen in App1 / 7Sunil Gavaskar Sanju Samson, IPL 2022 KKR vs RR : कोलकाता नाईट रायडर्स संघाला तब्बल पाच पराभवानंतर सोमवारी विजयाची चव चाखायला मिळाली. स्पर्धेत ६ एप्रिलनंतर काल (२ मे) त्यांना विजय मिळवता आला.2 / 7राजस्थानच्या संघाकडून कर्णधार संजू सॅमसनने ४९ चेंडूत ५४ धावा केल्या. त्यानंतर अखेरच्या टप्प्यात शिमरॉन हेटमायरने २७ धावा करत संघाला १५२ धावांपर्यंत मजल मारून दिली.3 / 7राजस्थान संघाच्या याच निर्णयप्रक्रियेबाबत भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर हे RR संघ व्यवस्थापन आणि संजू सॅमसनवर प्रचंड संतापले.4 / 7राजस्थानचा लयीत असलेला जोस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसन यांनी धावा केल्या, पण त्यांना वेगाने धावा करता आल्या नाहीत. त्यामुळे सामन्याच्या अखेरीस अपेक्षेपेक्षा काही धावा कमी पडल्याचे संजू सॅमसनने मान्य केले.5 / 7याच मुद्द्यावरून सुनील गावसकर यांनी आपलं परखड मत मांडलं. शिमरॉन हेटमायरसारख्या तगड्या फलंदाजाआधी रियान परागला पाठवणं हे त्यांना पटलं नाही. परागने केवळ १९ धावा केल्या, त्यानंतर हेटमायरला १३ चेंडू मिळाले. त्यात त्याने नाबाद २७ धावा केल्या.6 / 7या प्रकाराबाबत सुनील गावसकर म्हणाले, 'एखाद्याला फिनिशर म्हणून लेबल लावून टाकलं म्हणजे त्याने १४व्या किंवा १५व्या षटकानंतरच फलंदाजीसाठी यावं हे अजिबात बरोबर नाही. हेटमायर हा चांगल्या लयीत आहे ही बाब साऱ्यांनाच माहिती आहे. अशा वेळी ११व्या षटकात जरी विकेट पडली तरी त्याला फलंदाजीसाठी पाठवलं पाहिजे.' 7 / 7दरम्यान, या आव्हानाचा पाठलाग करताना KKRच्या फलंदाजीत मोक्याच्या क्षणी अंपायर्सच्या सुमार दर्जाच्या निर्णयप्रक्रियेमुळे कोलकाताला किमान तीन-चार वेळा वाईडच्या धावा मिळाल्या. त्यामुळे आणि नितीश राणा (नाबाद ४८) आणि रिंकू सिंग (नाबाद ४२) या जोडीच्या नाबाद अर्धशतकी भागीदारीच्या बळावर संघाला विजय मिळाला. आणखी वाचा Subscribe to Notifications