Join us  

Sunil Gavaskar on KL Rahul, IPL 2022 LSG vs GT: "तर भारतीय क्रिकेटमध्ये आणखी पुढे जाशील"; सुनील गावसकरांचा लखनौचा कर्णधार लोकेश राहुलला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 12:53 PM

Open in App
1 / 6

Sunil Gavaskar on KL Rahul, IPL 2022 LSG vs GT: दोन नव्या संघांच्या पहिल्यावहिल्या सामन्यात हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) च्या गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केलं. शेवटच्या काही षटकांमध्ये लखनौच्या गोलंदाजांना सामन्यावर पकड ठेवणं शक्य न झाल्याने त्यांचा पराभव झाला.

2 / 6

सामन्यात लखनौ संघाचं पहिल्यांदाच प्रतिनिधित्व करणारा लोकेश राहुल पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला. मोहम्मद शमीने त्याला माघारी धाडलं. तसेच कर्णधार म्हणूनही लोकेश राहुलला फार चमक दाखवता आली नाही.

3 / 6

राहुलला पंजाब किंग्स संघाच्या आणि टीम इंडियाच्या कर्णधारपदाचा अनुभव असूनही त्याला मोक्याच्या क्षणी सामन्यावर पकड मिळवता आली नाही. त्यानंतर माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी लोकेश राहुलला एक अतिशय मोलाचा सल्ला दिला.

4 / 6

'राहुल जेव्हा पंजाब किंग्स संघाचा कर्णधार होता, त्यावेळी त्याला आधीपासून मिळालेल्या खेळाडूंसोबतच खेळायचं होतं. त्याच्या हातात फार काही नव्हतं. त्यामुळे कदाचित त्याला हवे असलेले ११ खेळाडू मिळवणं त्याच्यासाठी कठीण गेलं असावं', असं गावसकर म्हणाले.

5 / 6

'आता राहुल नव्या कोऱ्या लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार आहे. त्याच्यापुढे वेगळं चॅलेंज आहे. अशा परिस्थितीत जर त्याने लौकिकाला साजेशी फलंदाजी करत आपल्या संघाला प्ले-ऑफ्सपर्यंत जरी पोहोचवलं तरी त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या दृष्टीने हे खूप मोठं पाऊल ठरेल आणि तो भारतीय क्रिकेटमध्ये आणखी पुढे जाईल', असं मोठं विधान सुनील गावसकरांनी केलं.

6 / 6

'लोकेश राहुल आणि क्विंटन डी कॉक हे कॉम्बिनेशन संघाला खूप पुढे घेऊन जाऊ शकतं. त्यातच डी कॉकला कर्णधारपदाचा अनुभव आहे. त्याने आफ्रिकेच्या संघाचं तिन्ही फॉरमॅटमध्ये नेतृत्व केलं आहे. त्यामुळे राहुलने त्याच्याशी सल्लामसलत करून निर्णय घेतल्यास फायद्याचं ठरेल', असंही 'लिटल मास्टर'ने नमूद केलं.

टॅग्स :आयपीएल २०२२सुनील गावसकरलोकेश राहुललखनौ सुपर जायंट्सहार्दिक पांड्या
Open in App