Join us  

Sunil Gavaskar on Rohit Sharma, IND vs SL 3rd T20 : "असं सतत होत राहिलं तर हे अजिबात चालणार नाही"; सुनील गावसकरांनी कर्णधार रोहितला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 8:42 PM

Open in App
1 / 6

Sunil Gavaskar on Rohit Sharma, IND vs SL 3rd T20 : भारतीय संघाने (Team India) रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेला ३-० असा व्हाईटवॉश दिला. भारतीय संघाने दमदार कामगिरी करत विक्रमी विजय मिळवला.

2 / 6

श्रेयस अय्यरने तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत तब्बल २००हून अधिक धावा कुटल्या. त्याला सामनावीर किताबासह मालिकावीर म्हणूनही गौरविण्यात आलं. पण माजी क्रिकेटपटू सुनील गावसकरांनी मात्र मालिका जिंकल्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी मांडल्या.

3 / 6

'भारताने जरी मालिका ३-० ने जिंकली असली तरी ही गोष्ट काहीशी काळजी करण्यासारखी आणि विचार करण्यासारखीच आहे. असं सतत घडणं हे टीम इंडियासाठी अजिबातच फायद्याचं नाही', असं सुनील गावसकर म्हणाले.

4 / 6

'जर एखाद्या सामन्यात गोलंदाजांना शेवटच्या काही षटकांमध्ये मार पडत असेल तर तो खेळाचा स्वभाव समजून सोडून देता येऊ शकेल. पण मालिकेत शेवटच्या ५-६ षटकांत भारतीय गोलंदाजांना तब्बल ८०-९० धावा चोपण्यात आल्या', याकडे गावसकरांनी रोहितचं लक्ष वेधलं.

5 / 6

'बुमराहच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करणं तितकंसं सोपं नाहीये. पण कर्णधार शनाका आणि सलामीवीर निसांका यांनी बुमराहसारख्या वेगवान गोलंदाजालाही चोप दिला. अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही', असं गावसकर यांनी स्पष्टपणे सांगितलं.

6 / 6

'गोलंदाजीचा एक प्लॅन ठरवला जायला हवा. पहिल्या १० षटकात कोण गोलंदाजी करणार आणि शेवटच्या ८-१० षटकांत कोण व कशी गोलंदाजी करणार याबद्दल रोहित शर्माच्या टीम इंडियाला गांभीर्याने विचार करायलाच लागेल', अशी भूमिका सुनील गावसकर यांनी मांडली.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकासुनील गावसकररोहित शर्माजसप्रित बुमराह
Open in App