आयपीएल २०२५ च्या हंगामा आधी होणाऱ्या मेगा लिलावाआधी १० फ्रँचायझी संघांनी प्लेयर रिटेन खेळासह संघ बांधणीचा पहिला डाव खेळला आहे. एकूण ४६ खेळाडूंना रिटेन करण्यात आले आहे.
सनरायझर्स हैदराबादच्या संघानं दक्षिण आफ्रिकेचा स्टार क्रिकेटर हेनरिक क्लासेन याच्यासाठी तब्बल २३ कोटी रुपये मोजले. यासह या खेळाडूच्या नावे खास रेकॉर्डची नोंद झाली आहे.
याआधी हा विक्रम भारताचा स्टार विराट कोहलीच्या नावे होता. २०१८ च्या आयपीएल लिलावाआधी RCB च्या संघाने विराट कोहलीला १७ कोटीसह रिटेन केले होते.
आयपीएल २०२५ च्या हंगामासाठी होणाऱ्या मेगा लिलावाआधी अनेक फ्रँचायझी संघांनी याआधीच्या विक्रमापेक्षा अधिक रक्कम मोजत स्टार खेळाडूंना रिटेन केल्याचे पाहायला मिळाले. एक नजर टाकुयात सर्वाधिक रक्कमेसह रिटेन झालेल्या आघाडीच्या खेळाडूंवर
आयपीएल २०२५ च्या आगामी मेगा लिलावाआधी हैदराबादच्या संघाने हेनरिच क्लासेनसाठी २३ कोटी मोजले. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात रिटेन खेळाडूला मिळालेली ही सर्वाधिक आणि विक्रमी रक्कम आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघानं विराट कोहलीसाठी २१ कोटी मोजले. आयपीएलमधील सर्वाधिक महागड्या रिटेन खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे.
लखनऊ सुपर जाएंट्सच्या संघानेही निकोलस पूरनला कायम ठेवण्यासाठी २१ कोटी मोजले. तो विराट कोहलीसह संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहे.
१८ कोटीसह रिटेन झालेल्या क्लबमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा यांचा समावेश होता.
राजस्थान रॉयल्सच्या संघानेही संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल या जोडीसाठी प्रत्येकी १८-१८ कोटी रुपये खर्च केले.
मुंबई इंडियन्सच्या संघाने जसप्रीत बुमराह तर गुजरात टायटन्सच्या संघाने राशीद खानसाठी १८ कोटी मोजले आहेत.