Suresh Raina, IPL 2022: स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक आहेत. नव्या हंगामात सुरेश रैना हा मैदानावर MS Dhoni च्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाकडून खेळताना न दिसता समालोचन क्षेत्रात पदार्पण करणार आहे.
रैना कुटुंब मालदीवमध्ये आपल्या मुलाचा, रिओचा वाढदिवस साजरा करताना दिसले. सुरेश रैना आणि त्याची पत्नी प्रियांकाने बुधवारी वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो पोस्ट केले.
Mr. IPL यावेळी कोणत्याही संघाचा भाग नसल्यामुळे तो आयपीएलमध्ये हिंदी कॉमेंट्री करताना दिसणार आहे. पण त्याआधी सुरेश रैना सध्या मालदीवमध्ये सुटी एन्जॉय करताना दिसला.
रैनाचा मुलगा रिओ याचे मालदीव मधील फोटोज चाहत्यांना भावले होते.
आपल्या मुलासोबतचा एक फोटो शेअर करत सुरेश रैनाने लिहिले की, हॅपी बर्थडे रिओ. तू दोन वर्षांचा आहेस, तू पटापट मोठा होतोयस यावर अजूनही मला विश्वास बसत नाही. आम्ही खूप भाग्यवान आहोत.
सुरेश रैनाची पत्नी प्रियांका चौधरी रैनाने हिनेदेखील वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले. त्या फोटोंमध्ये त्यांची मुलगी ग्रेशियादेखील असल्याचं दिसलं.
सर्व फोटो- Instagram , Twitter