'एक से बढकर एक' फ्रेम'! मिस्टर ३६० Surya Kumar Yadav वर बायकोनं असं व्यक्त केलं प्रेम

सूर्यकुमार यादवच्या बर्थडेच्या दिवशी त्याची पत्नी देविशा शेट्टीची खास पोस्ट दिसणार नाही, असं कसं होईल.

भारताचा स्टार बॅटर सूर्यकुमार यादव हा १४ सप्टेंबरला ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे.

क्रिकेटच्या मैदानात प्रत्येक कोपऱ्यात फटका खेळण्याच्या क्षमतेमुळे मिस्टर ३६० या नावाने ओळख निर्माण करणाऱ्या सूर्यावर बर्थडेच्या दिवशी शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय.

आता सूर्यकुमार यादवच्या बर्थडेला त्याची पत्नी देविशा शेट्टी शुभेच्छा देणार नाही, असे कसे होईल. सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असणाऱ्या देविशानं खास फोटो शेअर करत नवरोबावरील प्रेम व्यक्त केले आहे.

देविशा प्रत्येक मॅचवेळी नवरोबाला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियमवर हजेरी लावताना दिसते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सातत्याने सूर्यकुमार यादवसोबतचे खास क्षणही शेअर करत असते.

'एक से बढकर एक' फ्रेममधून नवरोबावर प्रेम व्यक्त करताना देविशानं शेअर केलेला हा फोटो एकदम खास आणि दोघांच्या नात्यातील जीवापाड प्रेम दाखवणारा आहे.

देविशा आणि सूर्या मुंबईतील एकाच कॉलेजमध्ये शिकले आहेत. तिथंच त्यांची जोडी जमली. दोघांनी २०१६ मध्ये लग्नगाठ बांधली होती.

तू माझा सखा, तू माझा प्रियकर अन् तुचं माझं जग, अशा आशयाच्या कॅप्शनसह देविशानं आपल्या आयुष्यातील सुर्याचं स्थान अधोरेखित केल्याचेही दिसून येते.

देविशानं सूर्यासोबतचे जे फोटो शेअर केले आहेत त्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सची बरसात करत चाहते जोडीवर प्रेमाची बरसात करताना दिसते.

सूर्यकुमार यादव हा भारतीय टी-२० संघाचा कॅप्टन झाला त्यावेळीही देविशाची भावनिक पोस्ट चर्चेत आली होती.