भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने एक नवीन कार खरेदी केली आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्या कारसोबतचे फोटोही शेअर केले आहेत.
सूर्यकुमारने विकत घेतलेली कार आहे निसान जोंगा. या कारची किंमत भारतात ६ लाखांपासून पुढे सुरू होते.
सूर्यकुमारने आपल्या कारच्या फोटोसह एक कॅप्शनही लिहिलं आहे. 'माझ्या कुटुंबातील भल्यामोठ्या नव्या खेळण्याला सगळ्यांनी hello म्हणा', असं ते कॅप्शन आहे.
महत्त्वाचे म्हणजे, सूर्यकुमार यादवने विकत घेतलेल्या या दमदार कारचं आणि धोनीचंही खास कनेक्शन आहे.
निसान जोंगा ही कार आधी युद्धभूमीवर भारतीय लष्करात वापरली गेली होती असं म्हणतात. पण जेव्हा या कारचं सर्वसामान्यांसाठी उत्पादन सुरू झालं तेव्हा धोनीने ही कार विकत घेतली.
महेंद्रसिंग धोनीकडे गडद हिरव्या रंगाची निसान जोंगा कार आहे. धोनीने जेव्हा ही कार घेतली, तेव्हा ही कार पुन्हा ट्रेंडमध्ये आली. धोनी त्याच्या कारला जीवापाड जपतो. (सर्व फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)