Join us  

बॅटने काच फोडली, वादामुळे कर्णधारपद गेले; सूर्यकुमारची गजब कहाणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2022 3:02 PM

Open in App
1 / 7

आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत सूर्यकुमार यादवने (Suryakumar yadav) चांगली खेळी केली आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवच्या फॅन्सची संख्या वाढत आहे. जेव्हा जेव्हा टीम इंडिया अडचणीत येते, तेव्हा मैदानात सूर्यकुमार यादवची चौफेर फटकेबाजी दिसून येते. त्याच्याविरुद्ध कशी गोलंदाजी करायची असा प्रश्न अनेक गोलंदाजांना पडला आहे.

2 / 7

सूर्यकुमार यादवची फटकेबाजी सध्याच्या घडीला प्रत्येक गोलंदाजाच्या अंगलट येत आहे. सूर्यकुमार यादवने या स्पर्धेत 75 च्या सरासरीने 225 धावा केल्या आहेत. त्याने 3 अर्धशतके झळकावली आहेत आणि त्याचा स्ट्राईक रेट 190 पेक्षा जास्त आहे. आज सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीला सलाम केला जात आहे, पण, त्याने खूप त्रास सहन करून आणि मेहनत करून हा मान मिळवला आहे.

3 / 7

सूर्यकुमार यादवच्या आयुष्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत. 2014 मध्ये सूर्यकुमार यादवसोबत असे काही घडले होते, ज्यानंतर त्यांचे नाव चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आले होते. 13 मार्च 2014 रोजी सूर्यकुमार यादव बीपीसीएलकडून टी-20 सामना खेळत होता. त्या कॉर्पोरेट ट्रॉफी सामन्यात सूर्यकुमार यादव लवकर आऊट झाला आणि त्यानंतर या खेळाडूने रागाच्या भरात ड्रेसिंग रूमची काच फोडली.

4 / 7

सूर्यकुमार यादवने आरशावर बॅट मारली आणि त्यानंतर त्याला मुंबई क्रिकेट असोसिएशनसमोर हजर व्हावे लागले. सूर्यकुमार यादवच्या कारकिर्दीतील वाईट टप्पा नुकताच सुरू झाला होता. यानंतर रणजी सामन्यादरम्यान सूर्यकुमार यादवचा त्याच्याच संघाचा खेळाडू शार्दुल ठाकूरसोबत वाद झाला. दोघेही मधल्या मैदानावर एकमेकांवर भडकताना दिसले.

5 / 7

दोघांमधील वादावादीच्या बातम्या आल्यानंतर सूर्यकुमार यादवकडून तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद काढून घेण्यात आले. इतकेच नाही तर सूर्यकुमार यादवला मधल्या रणजी स्पर्धेतूनही वगळण्यात आले. त्यावेळी मुंबईचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित म्हणाले की, त्यावेळी सूर्यकुमार यादव खूपच निराश दिसत होता. त्याचे लक्ष खेळावर नव्हते. पण त्यानंतर सूर्यकुमार यादवने ते केले जे सर्वांनाच जमत नाही.

6 / 7

एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसल्यानंतर कोणताही खेळाडू निराश होऊन जातो, पण सूर्यकुमार यादव मजबूत बनला. या खेळाडूने आपली विचारसरणी, जीवनशैली, प्रशिक्षण सर्वकाही बदलले. रिपोर्ट्सनुसार, सूर्यकुमार यादवने सर्वप्रथम मेडिटेशन करण्यास सुरुवात केली. याआधी सूर्यकुमारने मेडिटेशनकडे फारसे लक्ष दिले नाही, परंतु त्याने आपल्या चांगल्यासाठी प्रयत्न केले आणि प्रत्येक सामन्यात त्याला त्याचे फायदे दिसू लागले.

7 / 7

सूर्यकुमार यादवने आपल्या आहार आणि प्रशिक्षणात बदल केला. या खेळाडूने जिममध्ये खूप मेहनत घेतली आणि त्यामुळे त्याचे स्नायू मजबूत झाले. याशिवाय सूर्यकुमार यादवने विचार बदलला. तो खेळाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू लागला. त्याने धावा काढण्याचे वेगवेगळे मार्ग शोधले आणि असे फटके खेळण्याचा सराव सुरू केला, ज्यासाठी कोणत्याही गोलंदाजाला क्षेत्ररक्षण करणे अवघड होत आहे.

टॅग्स :सूर्यकुमार अशोक यादवट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२ऑफ द फिल्ड
Open in App