Join us  

Asia Cup 2022 Super 4 Ind vs Pak Highlight : जडेजा माघारी, आवेश आजारी! टीम इंडिया आज ३ बदलांसह उतरणार, जाणून घ्या Playing XI

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2022 3:27 PM

Open in App
1 / 8

India Vs Pakistan Super 4 Live Match Highlight : भारतीय संघाने आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभवाची चव चाखवली. आता सुपर ४ मध्ये India vs Pakistan पुन्हा एकमेकांसमोर आले आहेत. पण, दोन्ही संघांना दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा याने दुखापतीमुळे स्पर्धेतूनच माघार घेतली आहे, जलदगती गोलंदाज आवेश खान हाही आजारी असल्याने आज खेळण्याची शक्यता कमी आहे. पाकिस्तानच्या शाहनवाज दहानीने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. त्यामुळे दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन काय असेल याची सर्वांना उत्सुकता आहे.

2 / 8

आवेश खान ( Avesh Khan) याला ताप आल्याचे द्रविडने शनिवारी सांगितले. तो पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळणार नसल्याचे द्रविडने स्पष्ट केले. पण त्यानंतरच्या सामन्यासाठी तो फिट ठरेल अशी आशा त्याने व्यक्त केली. आवेशने आज सराव सत्रातही सहभाग घेतला नाही. त्याने दोन सामन्यांत ७२ धावा देताना दोन विकेट्स घेतल्या. हाँगकाँगच्या फलंदाजांनी त्याच्या ४ षटकांत ५३ धावा कुटल्या होत्या.

3 / 8

रवींद्र जडेजाला दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ३५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. हाँगकाँगविरुद्धही ४-०-१५-१ अशी कामगिरी केली होती आणि एक भन्नाट रन आऊटही केला होता. त्यामुळे त्याची उणीव भरून काढणे अवघड आहे. अशात त्याला रिप्लेसमेंट म्हणून दीपक हुडा, रिषभ पंत ही नावं चर्चेत आहेत.

4 / 8

रिषभ पंतला पहिल्या सामन्यात खेळवण्यात आले नव्हते. त्याच्याएवजी दिनेश कार्तिकला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवले. हाँगकाँगविरुद्ध हार्दिक पांड्याला विश्रांती दिल्यामुळे रिषभला संधी मिळाली. पण, फलंदाजी करण्यासाठी त्याला मैदानावर उतरण्याची गरजच पडली नाही. आजच्या सामन्यात हार्दिक पुनरागमन करणार आहे, त्यामुळे रिषभला परत बाहेर बसावे लागेल.

5 / 8

लोकेश राहुलचा फॉर्म चांगला नाही अशात त्याला आज विश्रांती दिल्यास रिषभची एन्ट्री होऊ शकते. असे झाल्यास विराट कोहली किंवा सूर्यकुमार यादव सलामीला रोहित शर्मासोबत येऊ शकतात. रिषभही ओपनिंगला येऊ शकतो. जडेजाच्या जागी रिषभची एन्ट्री होण्याची शक्यता अधिक आहे कारण संघात एकतरी डावखुरा फलंदाज हवा आहे.

6 / 8

आवेश खानच्या जागी दीपक चहरची सप्राईज एन्ट्री होऊ शकते. राखीव खेळाडू म्हणून तो संघासोबत आहे. तसे झाल्यास जलदगती गोलंदीजी जबाबदारी हार्दिक, भुवनेश्वर, दीपक व अर्षदीप यांच्यावर असेल. एक अतिरिक्त फिरकीपटू खेळवायचा झाल्या, आर अश्विन किंवा दीपक हुडा यांच्यापैकी एक प्लेइंग इलेव्हनमध्ये येऊ शकते

7 / 8

भारताचा संभाव्य संघ - रोहित शर्मा, लोकेश राहुल/रिषभ पंत, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या दीपक हुडा, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, आर अश्विन/दीपक चहर, अर्षदीप सिंग, युजवेंद्र चहल

8 / 8

टॅग्स :एशिया कप 2022भारत विरुद्ध पाकिस्तानरवींद्र जडेजाआवेश खान
Open in App