Join us  

T20 World Cup 2021: खरी ठरली मास्टरब्लास्टर Sachin Tendulkar ची भविष्यवाणी, सेमीफायनलपूर्वी जे सांगितलं तेच झालं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 8:15 PM

Open in App
1 / 12

भारतीय संघाचा माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ICC T20 विश्वचषक 2021 मध्ये पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणार्‍या सेमीफायनलच्या सामन्यापूर्वी कर्णधार अॅरॉन फिंचबाबत एक भविष्यवाणी केली होती. सचिन तेंडुलकरचं ते भाकित खरं ठरल्याचं दिसून येत आहे.

2 / 12

याची माहिती त्याने स्वतः इंस्टाग्रामवर दिली आहे. सचिनने त्याचा व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी व्यक्तिगतरित्या ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानदरम्यान खेळण्यात आलेल्या मॅचसंबंधी वक्तव्य केलं होतं.

3 / 12

गुरुवारी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना खेळवण्यात आला सेमीफायनलमधील दुसऱ्या सामन्यापूर्वी सचिन म्हणाला होता की मला पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅरोन फिंच यांच्यातील संघर्ष पहायला आवडेल.

4 / 12

जर सुरूवातीपासूनच फिंच आफ्रिदीच्या गोलंदाजीवर अँक्रॉस येऊन खेळला तो एलबीडब्ल्यू किंवा क्लिन बोल्ड होऊ शकतो, असं सचिननं फिचबाबत मॅचपूर्वी म्हटलं होतं.

5 / 12

सचिनची भविष्यवाणी त्यावेळी खरी ठरली जेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्ताननं केलेल्या १७७ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरला होता. तसंच या सामन्यात पहिली ओव्हर आफ्रिदीला देण्यात आली होती.

6 / 12

आफ्रिदीनं या सामन्यात दुसऱ्या बॉलवर फिंचला एलबीडब्ल्यू आऊट केलं आणि फिंच खातं उघडल्याशिवायच पॅव्हिलियनमध्ये माघारी परतला. फिंच आफ्रिदीनं टाकलेला चेंडू अॅक्रॉस जाऊन खेळला आणि चेंडू त्याच्या पॅडवर लागला.

7 / 12

सचिननं मॅचपूर्वीच सांगितलं होतं, जर शाहीन आफ्रिदीची गोलंदाजी अॅक्रॉस द लाइन जाऊन खेळली तर तो एलबीडब्ल्यू होऊ शकतो. सामन्यादरम्यान सचिननं वर्तवलं होतं अगदी तसंच झालं.

8 / 12

पहिल्या षटकात कर्णधार माघारी परतूनही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी धावांचा रन रेट सुरेख ठेवला. पाकिस्तानच्या धावांपेक्षा त्यांनी पहिल्या १० षटकांत १८ धावा अधिक केल्या, परंतु त्यांनी दोन अतिरिक्त विकेट गमावल्या.

9 / 12

टप्प्याटप्प्यानं विकेट पडूनही ऑस्ट्रेलियानं त्यांच्या धावांचा वेग कमी होऊ दिला नाही. डेव्हिड वॉर्नरच्या ( David Warner) फटकेबाजीनंतर मार्कस स्टॉयनिस ( Marcus Stoinis ) आणि मॅथ्यू वेड ( Matthew Wade) यांनी सहाव्या विकेटसाठी तुफानी खेळी केली. पाकिस्तानकडून क्षेत्ररक्षणात झालेल्या चुकांचाही ऑसींना फायदा झाला.

10 / 12

विश्वचषकाच्या कोणत्याही नॉक आऊट स्पर्धेत आजवर पाकिस्तानला (Pakistan) ऑस्ट्रेलियाचा (Australia) पराभव करता आला नाही. एकदिवसीय किंवा टी २० विश्वचषक पाकिस्तानला कायमच ऑस्ट्रेलियासमोर पराभव पत्करावा लागला आहे. पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामन्यात तेच झालं. मॅथ्यू वेडनं सामन्यात जबरदस्त फटकेबाजी करत पाकिस्तानला धुळ चारली.

11 / 12

२०२१ मध्ये डावखुऱ्या मॅथ्यू वेडच्या फटकेबाजीनं पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला. तर यापूर्वी २०१० मध्ये विश्वचषक सामन्यामध्ये मायकेल हसीनं २४ चेंडूंमध्ये ६० धावांची खेळी करत पाकिस्तानला धुळ चारली होती. तर यावेळी मॅथ्यू वेडनं १७ चेंडूंमध्ये ४१ धावा करत पाकिस्तानला थेट घरचाच रस्ता दाखवला. मॅथ्यू वेडच्या खेळीनं २०१० मधल्या मायकेल हसीच्या खेळीची आठवण आणून दिली.

12 / 12

यापेक्षा एक विशेष बाब म्हणजे दोन्ही खेळाडूंनी षटकार ठोकतच सामना जिंकवला होता. मायकेल हसीनं २०१० मध्ये झालेल्या टी २० विश्वचषक सामन्यात अखेरच्या ओव्हरमध्ये ३ षटकार ठोकत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. त्याचीच पुनरावृत्ती आता मॅथ्यू वेडच्या रूपानं झाली. मॅथ्यू वेडनं पाकिस्तानविरोधातील सामन्यात १९ व्या ओव्हरमध्ये ३ षटकार ठोकत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

टॅग्स :सचिन तेंडुलकरपाकिस्तानआॅस्ट्रेलियाट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१
Open in App