आज न्यूझीलंडविरोधात पाकिस्तानचा सामना आहे. भारताला नमविल्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये जोश हाय आहे. पाकिस्तान आपला विरोधक असला तरी देखील आकाश चोप्रासह अनेक भारतीयांना आज पाकिस्तान जिंकावा असे वाटत आहे. असे का वाटत आहे, जाणून घ्या...
भारतीय संघाची पुढील मॅच 31 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरोधात होणार आहे. या आधी टीम इंडियाची नजर ग्रुपमधील अन्य टीममधील सामन्यांवर असणार आहे. टीम इंडियाच्या माजी सलामीवीराने सांगितले की, बाबर आझमच्या संघाने न्यूझीलंडला हरविले तर भारतालाच त्याचा फायदा होणार आहे.
चोप्राने सांगितले की, मला वाटे जर पाकिस्तानने आज न्यूझीलंडला हरविले तर भारताला त्याची मदत होईल. जर याच्या उलट म्हणजेच न्यूझीलंडने पाकिस्तानला हरविले तर त्रिकोणी लढा सुरु होईल. जर भारताने न्यूझीलंडसह ग्रुपमधील सर्व संघांना हरविले तर नेट रनरेटच्या स्पर्धेत येऊ शकते.
पाकिस्तानने जर न्युझीलंडला हरविले तर त्यांचे सेमीफायनलमध्ये जाणे जवळपास पक्के होईल. जर पाकिस्तानने न्यूझीलंडला हरविले तर नंतरचे सामने हे एकतर्फी होतील. अफगाणिस्तान आणि क्वालिफायरमधून आलेले दोन संघ स्कॉटलंड आणि नामीबिया यांच्याशी खेळावे लागणार आहे. मग पाकिस्तानला सेमीमध्ये जाणे सोपे होणार आहे.
पाकिस्तानच्या संघाला न्यूझीलंडविरोधात बदला घ्यायचा आहे. कारण त्यांनी पाकिस्तान दौरा शेवटच्या क्षणी रद्द केला होता. यामुळे त्यांच्यात संतापाचे वातावरण होते. आजचा सामना हा त्यांच्यासाठी एक मोठा सामना असेल. कारण पाकिस्तानचा अपमान झाला, असे त्यांना वाटत आहे. न्यूझीलंडविरोधात लढण्यासाठी त्यांच्याकडे कारण आहे.
दुसरी बाब म्हणजे पाकिस्तान जिंकला तर भारताला पॉईंट टेबलमध्ये फायदा होईल. कारण सेमीमध्ये दोन संघ जाऊ शकतात. एक पाकिस्तान आणि दुसऱ्या संघासाठी भारताला लढाई करावी लागेल. न्यूझीलंड जर आज हरला तर भारताला थोडा दिलासा मिळेल.
भारताला न्यूझीलंडसोबत जिंकावेच लागेल. यानंतर अफगाणिस्तान, नामीबिया आणि स्कॉटलंडसोबत मोठे विजय प्राप्त करावे लागतील. पाकिस्तान आणि भारताने न्यूझीलंडला हरविले तर भारत सेमीमध्ये पोहोचेल.
ग्रुप बी मधील अफगाणिस्तानने स्कॉटलंडला मोठ्या फरकाने हरविले आहे. यामुळे सध्या पाकिस्तान, अफगाणिस्तानचे 2 पॉईंट झाले आहेत. यामुळे भारताला पुढील सर्व सामने जिंकावे लागणार आहेत.