Join us  

T20 World Cup 2022 Semifinal: ऑस्ट्रेलिया की न्यूझीलंड? भारत सेमीफायनलला गेल्यास कोण येणार समोर, गोधळात टाकतंय गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2022 8:42 AM

Open in App
1 / 8

T20 विश्वचषक 2022 च्या सुपर-12 सामन्यांमुळे उपांत्य फेरीचे चित्र काहीसे स्पष्ट होऊ लागले आहे. ग्रुप-2 मधील टीम इंडियाची सेमीफायनलसाठी जोरदार दावेदारी दिसून येत आहे, कारण त्यांनी त्यांच्या 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत आणि आता पुढील दोन सामन्यांमध्ये विजयाची पूर्ण शक्यता आहे. दुसरीकडे, जर गट 1 चा विचार केला तर सेमीफायनल गाठण्याच्या शर्यतीत दोन संघ आघाडीवर आहेत.

2 / 8

समीकरणांवर नजर टाकली, तर टीम इंडियाने सेमीफायनल गाठली, तर समोर कोण असेल आणि फायनल गाठण्यासाठी कोणाला बाजी मारावी लागेल, हे दिसून येतं. टीम इंडियाचे सेमीफायनल गाठण्याचे समीकरण समजून घेऊ आणि पाहूया भारताचा सामना नक्की कोणत्या संघाशी होऊ शकतो.

3 / 8

या T20 विश्वचषक 2022 मध्ये भारताने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. यापैकी दोन सामन्यात भारताला विजय मिळाला तर एका सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. गुणतालिकेत, भारत सध्या त्यांच्या गटात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

4 / 8

भारतीय संघाचे 3 सामन्यांत 4 गुण आहेत आणि भारतीय संघाचा नेट रनरेट +0.844 आहे. भारताला अजून बांगलादेश आणि झिंबाब्वेविरोधा असे दोन सामने खेळायचे आहेत. दिसण्यासाठी हे सामने सोपे वाटत असले तरी खेळात काहीही होऊ शकते हे नाकारता येत नाही.

5 / 8

भारताने अखेरचे दोन सामनेही जिंकले तर भारतीय संघाचे एकूण 8 गुण होती. अशात भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे. परंतु दक्षिण आफ्रिकेचा संघदेखली अखेरचे दोन सामने जिंकला तर त्यांचे एकूण 9 गुण होतील. असे झाल्यास भारतीय संघ दुसऱ्या स्थानी जाईल. दक्षिण आफ्रिकेचे अखेरचे दोन सामने पाकिस्तान आणि नेदरलँडविरोधात आहेत.

6 / 8

सेमीफायनलचे सामने पाहिले तर समीकरण अतिशय स्पष्ट आहे. पहिल्या गटातील टॉपर टीम दुसऱ्या गटातील दुसऱ्या क्रमांकाच्या टीमशी भिडेल. तर दुसऱ्या गटातील टॉपर टीम पहिल्या गटातील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी भिडेल. पहिल्या गटात पहिल्या दोन क्रमांकासाठी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हेच संघ प्रबळ दावेदार दिसत आहेत.

7 / 8

पण इथे इंग्लंडचा संघही शर्यतीत आहे. त्यांचे दोन सामने बाकी आहेत. यातील एक सामना न्यूझीलंडविरुद्ध आहे. म्हणजेच इंग्लंडने त्यांचे दोन्ही सामने जिंकले तर ऑस्ट्रेलियाचा खेळ खराब होईल आणि तेच सेमीफायनलच्या शर्यतीत राहतील. अशावेळी न्यूझीलंड आणि इंग्लंडचा नेट-रन रेट ठरवेल की ते गटात नंबर-1 असतील की नंबर-2 वर.

8 / 8

म्हणजेच टीम इंडिया आपल्या ग्रुपमध्ये नंबर-1 वर राहिली तर भारतीय संघ इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाशी टक्कर देऊ शकतो. जर भारत आपल्या गटात नंबर-2 राहिला तर उपांत्य फेरीत न्यूझीलंड किंवा इंग्लंडशी सामना होऊ शकतो. म्हणजेच या समीकरणानुसार सर्वकाही घडले तर भारताला उपांत्य फेरीत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंडचा सामना करावा लागू शकतो.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलियान्यूझीलंड
Open in App