Join us  

T20 World Cup 2022: परी म्हणू की अप्सरा... टीम इंडियातील एकमेव महिला स्टाफ, तिचा बोल्ड लूक आणि सौंदर्य पाहून व्हाल फॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 6:20 PM

Open in App
1 / 6

ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० वर्ल्डकप खेळत असलेल्या १५ सदस्यीय टीम इंडियासोबत १६ बॅकरूम स्टाफ सुद्धा दिमतीला आहे. १६ जणांच्या बॅकरूम स्टाफमध्ये केवळ एकच महिला आहे. सध्या ती चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. जाणून घेऊयात तिच्याविषयी.

2 / 6

टीम इंडियाच्या बॅकरुम स्टाफमध्ये असलेल्या एकमेव महिला प्रोफेशनलचं नाव आहे राजलक्ष्मी अरोडा. तिचं टोपण नाव राजल अरोडा आहे. ती गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियासोबत प्रवास करत असते.

3 / 6

राजलक्ष्मी अरोडा बीसीसीआयची एक सीनियर मीडिया प्रोड्युसर आहे. ती भारतीय खेळाडू आणि त्यांच्या फॅन्समधील बॉंड मजबूत करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असते.

4 / 6

राजलक्ष्मी अरोडाने आपल्या प्रोफेशनल करिअरची सुरुवात एक कंटेंट रायटर म्हणून केली होती. ती २०१५ मध्ये एक सोशल मीडिया मॅनेजर म्हणून ती बीसीसीआयमध्ये दाखल झाली होती. आता ती एक सीनियर मीडिया प्रोड्युसर आहे.

5 / 6

राजलक्ष्मी अरोडाने पुण्यातील सिम्बॉयसेस इंस्टिट्युट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशनमधून मीडियाचं शिक्षण घेतलं होतं. राजलक्ष्मी अरोडाने रिवरडेल हायस्कूलमधून शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर शाळेच्या बास्केटबॉल आणि शूटिंग संघांचीही सदस्य राहिली होती.

6 / 6

राजलक्ष्मी अरोडा हिला २०१९ मध्ये बीसीसीआयच्या चार सदस्यीय अंतर्गत समिती (आयसी)च्या प्रमुखच्या रूपात नामांकित केले होते. राजलक्ष्मी अरोडा बीसीसीआयच्या अंतर्गत तक्रार समितीचीही प्रमुक होती. ती खेळाडूंच्या गैरवर्तनासारख्या चिंतांचं निराकरण करायची.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२
Open in App